Megha Shetty: कन्नड सुपरस्टार मेघा शेट्टीचं मराठी सिनेमात पदार्पण; ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’मध्ये मुख्य भूमिकेत

या सिनेमात कन्नड कलाकार कवीश शेट्टी, मेघा शेट्टी यांसोबत मराठीतील शिवानी सुर्वे, विराट मडके या कलाकारांचा समावेश आहे. सदागरा राघवेंद्र यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

Megha Shetty: कन्नड सुपरस्टार मेघा शेट्टीचं मराठी सिनेमात पदार्पण; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'मध्ये मुख्य भूमिकेत
Megha Shetty: कन्नड सुपरस्टार मेघा शेट्टीचं मराठी सिनेमात पदार्पण
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Aug 05, 2022 | 6:35 PM

‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ (After Operation London Cafe) या सिनेमाचं दुसरं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातून कन्नड अभिनेत्री मेघा शेट्टी (Megha Shetty) ही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. निर्माचे दिपक राणे यांनी आपल्या या सिनेमातून मेघाला लाँच केलं आहे. मेघा शेट्टी ही कन्नड (Kannada) टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मेघाची जोथे जोलाई ही मालिका चांगलीच गाजली होती. ट्रायबल रायडींग आणि दिलपसंद या सिनेमातही मेघाने काम केलं आहे. कन्नड इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून मेघाचं नाव घेतलं जातं.

दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्री यांची निर्मिती असलेला ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा रोमँटिक-अॅक्शनपट आहे. या सिनेमात कन्नड स्टार कवीश शेट्टी मुख्य भूमिकेत आहे आणि त्याचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता या सिनेमातील नायिका मेघा शेट्टी हिचं पोस्टर प्रदर्शित कऱण्यात आलं आहे. मेघाच्या वाढदिवसानिमित्त तिचा या सिनेमातील लूक समोर आला आहे. कवीशचं पोस्टर ॲक्शन अंदाजात दिसून आलं होते. तर मेघाचा लूक हा शांत, साधा, सालस असा आहे. पाहताक्षणी प्रेमात पडावं असा हा लूक मेघाचा आहे.

पहा पोस्टर-

 

View this post on Instagram

 

A post shared by Megha Shetty (@meghashetty_officiall)

दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीने एकत्रित येऊन केलेला हा सिनेमा मराठी आणि कन्नड भाषेत चित्रीत झाला आहे. तर हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम या भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कन्नड कलाकार कवीश शेट्टी, मेघा शेट्टी यांसोबत मराठीतील शिवानी सुर्वे, विराट मडके या कलाकारांचा समावेश आहे. सदागरा राघवेंद्र यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. तर दीपक राणेंसोबत या सिनेमाची निर्मिती विजय कुमार शेट्टी आणि रमेश कोठारी यांनी केली आहे. हा सिनेमा जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होईल.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें