AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तोवर कठोर कारवाई नाही”, ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ प्रकरणी महेश मांजरेकर यांना मोठा दिलासा

अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा सिनेमा 'वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा' प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. या चित्रपटातील काही बोल्ड सीनवर आक्षेप घेण्यात आला आहे. यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी झाली.

तोवर कठोर कारवाई नाही, 'वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा' प्रकरणी महेश मांजरेकर यांना मोठा दिलासा
महेश मांजरेकर
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 3:49 PM
Share

आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा नवा सिनेमा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) प्रदर्शनाआधीच वादाच सापडला आहे. या चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे हा चित्रपट वादात सापडला आहे. पण मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) महेश मांजरेकर यांना दिलासा मिळाला आहे. “पुढची सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नका”, असं उच्च न्यायालयाने म्हटलंय. या चित्रपटातील काही सीनवर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटतील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्याची मागणी केली जातेय. तर काहींनी “हा चित्रपट प्रदर्शितच केला जाऊ नये”, अशी भूमिका घेतली आहे. अश्यातच मुंबई उच्च न्यायालयाने महेश मांजरेकरांना दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने या सिनेमाविरोधात तक्रार करण्यात आली होती.

न्यायालयाने काय म्हटलं?

अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा सिनेमा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ प्रदर्शनाआधीच वादाच सापडला. पण या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मांजरेकरांना दिलासा दिला आहे. “पुढची सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नका”, असं उच्च न्यायालयाने म्हटलंय.

महेश मांजरेकारांचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात!

महेश मांजरेकरांचा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या सिनेमाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी युट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील काही सीनवरुन हा वाद सुरु झाला. हेच आक्षेपार्ह सीन चित्रपटातून काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी महिला आयोगाने थेट पत्र लिहून केली होती. तसंच हा ट्रेलरही युट्यूबवरुन काढून टाकावा, अशी मागणीही महिला आयोगाने केली. त्यानंतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चित्रपटाचा ट्रेलर हटवण्यात आला.

चित्रपटात नेमकं काय?

ज्येष्ठ नाटककार, ज्यांचं नुकतंच निधन झालंय, त्या जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या

भांगेत सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र.. हुमा कुरेशीचे फोटो पाहून नेटकरी पडले पेचात!

Miss Ukraine Anastasiia lenna : मिस युक्रेनच्या हाती बंदूक, अनास्तासिया लेना सैन्यात भरती?

‘सुशांतचा मृत्यू ही आमच्या नात्याची खरी अग्निपरीक्षा’, अंकिताच्या नवऱ्याने त्याच्या मनातलं सांगितलं

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.