Sagar Karande : कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट! नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी सागर कारंडेचा लोकल प्रवास

| Updated on: Apr 02, 2022 | 2:16 PM

अभिनेता सागर कारंडेने नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास केला. 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकात सध्या तो काम करतोय. या नाटकाचा काल वाशी आणि बोरीवलीला प्रयोग होता. या प्रयोगाला वेळेत पोहोचता यावं यासाठी त्याने लोकने प्रवास करण्याचा पर्याय निवडला.

Sagar Karande : कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट! नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी सागर कारंडेचा लोकल प्रवास
अभिनेता सागर कारंडेचा लोकल प्रवास
Image Credit source: सागर कारंडे इन्स्टाग्राम
Follow us on

मुंबई : कलाकार मंडळी म्हटलं की त्याचा एक वेगळा रूबाब आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. पण काही अभिनेते-अभिनेत्री या सगळ्या कल्पनांना छेद देल साधं राहाणं पसंत करतात. चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कारंडे (Sagar Karande) सध्या त्याच्या अश्याच साधेपणामुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतंच नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास केला. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ (Hich tar Familychi Ganmat Ahe) या नाटकात सध्या तो काम करतोय. या नाटकाचा काल वाशी आणि बोरीवलीला प्रयोग होता. या प्रयोगाला वेळेत पोहोचता यावं यासाठी त्याने लोकने (Mumbai Local) प्रवास करण्याचा पर्याय निवडला. त्याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलाय.

सागरची इन्स्टाग्राम पोस्ट

अभिनेता सागर कारंडेने नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास केला. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात सध्या तो काम करतोय. या नाटकाचा काल वाशी आणि बोरीवलीला प्रयोग होता. या प्रयोगाला वेळेत पोहोचता यावं यासाठी त्याने लोकने प्रवास करण्याचा पर्याय निवडला. त्याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. याला त्याने “नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहचण्यासाठी लोकलने प्रवास…”, असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या फोटोला 15 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर तुझ्यातला साधेपणा आवडला असं अनेकांनी कमेंट करत सांगितलं आहे. एकाने सागरला तुला गर्दीत चढता आलं का? असा प्रश्न विचारला. तर दुसऱ्याने सागर तु मास्क लावल्यानं तुला ट्रेनमध्ये कुणी ओळखलं नाही, अशी कमेंट केली आहे.

संबंधित बातम्या

My Dad’s Wedding : सुभाष घईंच्या ‘माय डॅड्स वेडिंग’ची घोषणा, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पोस्टर आऊट…

will smith: ‘थप्पड की गुंज’चे परिणाम! अखेर अभिनेता विल स्मिथचा ॲकडमीचा राजीनामा

“मला स्टारची गरज नाही”, The Kashmir File चे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींचा कंगना रनौतला चित्रपटात घेण्यास नकार