Video : घरातील शेंडेफळाचं काय होतं? मृण्मयीचा बहीण गौतमी देशपांडेवरचा प्रेमळ अत्याचार…

Video : घरातील शेंडेफळाचं काय होतं? मृण्मयीचा बहीण गौतमी देशपांडेवरचा प्रेमळ अत्याचार...
मृण्मयी देशपांडे, गौतमी देशपांडे
Image Credit source: मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम

मराठी सिनेसृष्टीततील लोकप्रिय बहिणींची जोडी म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे. या दोघीही एकमेकींवर खूप प्रेम करतात. पण मोठी असल्याचा फायदा घेत मृण्मयी गौतमीवर अत्याचार करते... पण प्रेमळ!

आयेशा सय्यद

|

Mar 28, 2022 | 12:38 PM

मुंबई : मराठी सिनेसृष्टीततील लोकप्रिय बहिणींची जोडी म्हणजे मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) आणि गौतमी देशपांडे(Gautami Deshpande). या दोघीही एकमेकींवर खूप प्रेम करतात. पण मोठी असल्याचा फायदा घेत मृण्मयी गौतमीवर अत्याचार करते, हे आपण अनेकदा पाहिलं आहे. आता तर तिने मृण्मयीला चक्क तिची पर्सनल स्पॉट केलंय. तुम्हाला हे खरं वाटत नसेल पण हे खरं आहे. एरव्ही सिनेमात गोड भूमिका करणारी मृण्मयी तिच्या बहिणीवर अत्याचार करते, पण प्रेमळ…याचा एक व्हीडिओ मृण्मयीने शेअर केला आहे. यात ती गौतमीला ऑर्डर्स् देताना दिसत आहे.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात ती म्हणते, “जेव्हा एखादा इव्हेंट असतो आणि माझ्याकडे माझा पर्सनल स्पॉट सुट्टीवर असतो तेव्हा… माझ्याकडे माझा पर्सनल स्पॉट असतो.” मग ती गौतमीला हाक मारते. गौतमी तिला लागणारं सगळं सामान घेऊन येते. मग गौतमीला ती कॉफी करायला सांगते. त्यातही मृण्मयीच्या हजार डिमांडस्… मग फोटोशूट करताना तिचा पदर उडवायला सांगते. इथेही ती गौतमीवर चिडचिड करते. अन् मग येतो क्लायमॅक्स… ती गौतमीला म्हणते “तुला नाही बोलावलं ना झी गौरव पुरस्कार सोहळ्याला…” मग गौतमी जरा चिडते अन् निघून जाते… असा एक फनी व्हीडिओ मृण्मयीने शेअर केलाय. हा व्हीडिओ तिने गौतमीला टॅग केलाय.

देशपांडे सिस्टर्सचा व्हीडिओ

कमेंट बॉक्स

अभिनेता अभिजीत खांडकेकर यांने या व्हीडिओवर कमेंट केली आहे.”मृण्मयी माजुरडी, बिचारी गौतमी”, असं तो म्हणाला आहे.अभिजीतच्या या कमेंटवर मृण्मयीने “तू मला ओळखलंच नाहीस”, अशी कमेंट केली आहे. अभिजीत म्हणतो “मी तुला नीट ओळखतो!” या व्हीडिओत नेटकरी गौतमीच्या बाजूने उभे राहिलेत. अनेकांनी या व्हीडिओला दुजोरा देत आमच्याही घरात शेंडेफळाचं असंच होतं, असं म्हटलंय. “अखिल भारतीय शेंडेफळ संघटनेतर्फे मी समदुःखी सदस्य ह्या आणि असल्या व्हीडीओचा निषेध करतो”,असं एका युजरने म्हटलंय.

देशपांडे सिस्टर्सने याआधीही असे फनी व्हीडिओ शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या

RRR box office collection: पहिल्या वीकेंडमध्ये RRRची दणक्यात कमाई; जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Oscars 2022: ऑस्करची ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? तिची किंमत नेमकी किती?

Oscars 2022 complete winners list: ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलेल्यांची संपूर्ण यादी

Oscar 2022: भडकलेल्या विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली; उपस्थितांना बसला आश्चर्याचा धक्का!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें