AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रंजना’मधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!, सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Ranjana Deshmukh : अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास चित्रपट रूपात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे...

'रंजना'मधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!, सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार
| Updated on: Jul 23, 2022 | 1:31 PM
Share

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयानं रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. आपल्या चौफेर अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांचं नाव आघाडीवर आहे. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. त्या काळातील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करताना अभिनेत्यांसोबत जोड्या जुळवत त्यांनी बरेच सिनेमे गाजवले. अशा चतुरस्र अभिनेत्री असणाऱ्या रंजना यांचा जीवनप्रवास रंजना या चित्रपट (Ranjana Movie) रूपात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

रंजना यांच्या जीवनावर आधारलेल्या ‘रंजना – अनफोल्ड’ या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. डॅा. श्रीकांत भासी, चेअरमन – कार्निव्हल ग्रुप हे या चित्रपटाची प्रस्तुती करणार असून कार्निव्हल मोशन पिक्चर्स आणि वैशाली सरवणकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘रंजना – अनफोल्ड’ या चित्रपटाद्वारे रंजना देशमुख यांचा प्रवास उलगडण्याचं शिवधनुष्य उचललं आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग हे या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करून पुढल्या वर्षी 3 मार्च 2023 रोजी ‘रंजना – अनफोल्ड’ रसिकांसमोर सादर करण्याची योजना आखण्यात आली आहे.

मुंबईतच जन्मलेल्या रंजना यांनी 1960 ते 2000 पर्यंत विविध व्यक्तिरेखा साकारत मराठी रसिकांचं मनोरंजन केलं. वयाच्या पाचव्या वर्षीच ‘हरिश्चंद्र तारामती’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून काम करत त्या सिनेसृष्टीत दाखल झाल्या. तरुणपणी ‘असला नवरा नको गं बाई’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत त्यांनी कौतुकाची थाप मिळवली. त्यानंतर ‘मुंबईचा फौजदार’, ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘गुपचुप गुपचुप’, ‘बहुरूपी’, ‘बिन कामाचा नवरा’, ‘खिचडी’ अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत त्यांनी आपल्या कलागुणांचं दर्शन घडवलं. आता पुन्हा एकदा त्या बायोपीकच्या रूपात मराठी रसिकांसमोर येणार आहेत

कार्निवल मोशन पिक्चर्स हे डॉ. श्रीकांत भासी यांचे एक अग्रगण्य प्रॉडक्शन स्टुडिओपैकी एक असून आजपर्यंत अनेक उल्लेखनीय बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे, ज्यामध्ये ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ – क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरवर आधारित हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषांमधील चित्रपट, शिवसेना प्रमख बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा हिंदी आणि मराठी चित्रपट केले असून ‘मेरे देश की धरती’, ‘ब्लँक’ आणि ‘वार छोड ना यार’ या बॉलीवूड चित्रपटांचादेखील त्यात समावेश आहे. ‘सेकंड शो” या मल्याळम चित्रपटातुन कार्निवल मोशन पिक्चर्सने मल्याळम सुपरस्टार दुलकर सलमानला लाँच केले. ‘व्हायोलिन’, ‘मॅटिनी’, ‘हँगओव्हर’, ‘आदि कप्यारे कूटमणी’, ‘मुधुगव’, एडक्कड बटालियन 06′ या प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती केली असून आता मराठीतील पहिल्यावहिल्या “रंजना….अनफोल्ड” हा चित्रपट घेऊन येण्यास सज्ज होत आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.