AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लाईफलाईन’ सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली; माधव अभ्यंकर दिसणार ‘या’ विशेष भूमिकेत

Actor Madhav Abhyankar in Lifeline Movie Role : अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'लाईफलाईन' सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. माधव अभ्यंकर यांच्या भूमिकेविषयी माहिती समोर आली आहे. माधव अभ्यंकर कोणती भूमिका साकारत आहेत? वाचा सविस्तर...

'लाईफलाईन' सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली; माधव अभ्यंकर दिसणार 'या' विशेष भूमिकेत
माधव अभ्यंकर, अभिनेतेImage Credit source: tv9
| Updated on: Jul 04, 2024 | 7:47 PM
Share

आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा ‘लाईफलाईन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेते माधव अभ्यंकर यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या महाराष्ट्राचे लाडके ‘अण्णा’ माधव अभ्यंकर यांची व्यक्तिरेखा समोर आली आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात चित्रपटातील माधव अभ्यंकर यांच्या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आलं. आपल्या विचारांवर, मतांवर ठाम असणाऱ्या एका खंबीर किरवंताची माधव अभ्यंकर या चित्रपटात भूमिका साकारत आहेत.

आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने माधव अभ्यंकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता ‘लाईफलाईन’ मधून एका वेगळ्याच भूमिकेतून ते चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या माधव अभ्यंकर बोलते झाले.

भूमिकेविषयी काय म्हणाले?

देव आयुष्य देतो, तर किरवंत मोक्ष देतो, अशा धार्मिक विचारसरणीची ही व्यक्तिरेखा आहे. त्याचा भक्ती, श्रद्धा यांवर जास्त विश्वास आहे. प्रत्येक धार्मिक क्रियेमागे काही कारण असते, हे पटवून देणारी ही व्यक्तिरेखा आहे. यापूर्वी मी अनेक भूमिका साकारल्या परंतु अशा प्रकारची भूमिका मी प्रथमच साकारत आहे. त्यातही अशोक सराफ यांसारखे मातब्बर कलाकार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे ही माझ्यासाठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. तरुण दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही कमाल होता. हल्लीच्या तरुणाईचा दृष्टिकोन, त्यांची कामाची पद्धत हेसुद्धा शिकण्यासारखे आहे, असं माधव अभ्यंकर म्हणाले.

सिनेमात कोण- कोण कलाकार?

क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत, ‘लाईफलाईन’ या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्या मुख्य भूमिका आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे साहिल शिरवईकर यांनी दिग्दर्शिन केलं आहे.

राजेश शिरवईकर यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत तर अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांचा आवाज लाभला आहे. 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.