AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी चित्रपटांची मांदियाळी, हास्याची मेजवानी घेऊन येणारा ‘इमेल फिमेल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

सोशल मीडियामुळे सर्वसामान्यांनाही आपल्या भावनांना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम सापडले. मात्र अभिव्यक्त होण्याच्या या माध्यमांनी माणसाचे व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्य कसे धोक्यात आणले आहे हे दाखवून देणारा ‘एस.एम.बालाजी प्रोडक्शन’ आणि अमोल कागणे फिल्म्स् प्रस्तुत ‘इमेल फिमेल’  हा चित्रपट 17 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

मराठी चित्रपटांची मांदियाळी, हास्याची मेजवानी घेऊन येणारा ‘इमेल फिमेल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
Email Female
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 10, 2021 | 12:49 PM
Share

मुंबई : सोशल मीडियामुळे सर्वसामान्यांनाही आपल्या भावनांना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम सापडले. मात्र अभिव्यक्त होण्याच्या या माध्यमांनी माणसाचे व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्य कसे धोक्यात आणले आहे हे दाखवून देणारा ‘एस.एम.बालाजी प्रोडक्शन’ आणि अमोल कागणे फिल्म्स् प्रस्तुत ‘इमेल फिमेल’  हा चित्रपट 17 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.

सध्या जाहिरातींमधूनही कधी नवनवीन मराठी चेहरे आता दिसू लागले आहेत. अशाच वेगवेगळ्या जाहिरातींमधून घराघरांत पोहोचलेले दोन मराठी चेहेरे आता ‘इमेल फिमेल’ या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. अभिनेता निखिल रत्नपारखी आणि कांचन पगारे ही जाहिरात क्षेत्रातील दोन परिचित नावं आता ‘इमेल फिमेल’ चित्रपटात आपली कमाल दाखवत धमाल घडवणार आहेत. या दोघांचा जाहिरातीतला ‘शॉर्ट अँड स्वीट’ असा अंदाज या चित्रपटातून दिसणार आहे.

काय आहे कथा?

तंत्रज्ञानाने आपल्यासाठी नवनवीन सुविधा निर्माण केल्या असल्या तरी ते वापरण्याचे योग्य ते भान दिले नाही हे दाखवून देताना सोशल मीडियाचा होत असलेला चुकीचा वापर यावर ‘इमेल फिमेल’  चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रलोभनाला बळी ठरलेल्या एका मध्यमवर्गीय शंतनूची गोष्ट ‘इमेल फिमेल’ चित्रपटातून मांडण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या खूप व्यक्ती असतात. पण त्यांच्यासोबत भरकटत जाणारे सुजाण आणि सुशिक्षित तरुणही यांसारख्या गोष्टींना तेवढेच जबाबदार असतात हे दाखवण्याचा प्रयत्न ‘इमेल फिमेल’च्या माध्यमातून केला आहे.

दिग्गजांची फौज!

निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन यांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. छायांकन मयुरेश जोशी तर कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे.

सोनू निगम, जावेद अली, आनंदी जोशी, ममता शर्मा यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सुप्रसिद्ध संगीतकार स्वर्गीय श्रवण राठोड आणि अभिजीत नार्वेकर यांनी संगीताची तर पार्श्वसंगीताची जबाबदारी प्रकाश नर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा सुहास गवते आणि देवयानी काळे यांची आहे. कार्यकारी निर्माते स्वप्नील वेंगुर्लेकर आहेत. निर्मिती सल्लागार अविनाश परबाळे आहेत.

हेही वाचा :

Satyamev Jayate 2 | ‘दिलबर’नंतर नोरा फतेहीचे ‘दिलरुबा’वर ठुमके, डान्स मुव्ह्स पाहून चाहतेही झाले घायाळ!

Special Story | Happy Birthday Ashutosh Rana | ज्याने सेटवरून हाकललं, त्यानेच पहिला ब्रेक दिला अन् आशुतोष राणांनी पडदा गाजवला!

Aai Kuthe Kay Karte | आशुतोष केळकर अरुंधतीच्या आयुष्यात आणणार आशेचा नवा किरण, वाचा मालिकेत पुढे काय घडणार?

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...