अभिनेत्रीच नव्हे कवयित्री देखील! प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला

प्राजक्ताचे नाव काढताच समोर येतात ती मंद सुगंधाची, मन प्रफुल्लित करणारी मोहक फुले. जुलै महिन्यात ही फुले बहरून येतात आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. अशाच प्राजक्तला साजेसे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali).

अभिनेत्रीच नव्हे कवयित्री देखील! प्राजक्ता माळीचा 'प्राजक्तप्रभा' काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला
प्राजक्ता माळी
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 5:43 PM

मुंबई : प्राजक्ताचे नाव काढताच समोर येतात ती मंद सुगंधाची, मन प्रफुल्लित करणारी मोहक फुले. जुलै महिन्यात ही फुले बहरून येतात आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. अशाच प्राजक्तला साजेसे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक अशा विविध माध्यमांमधून तिने कायमच तिच्या कलाकृतीचा सुगंध सर्वत्र दरवळवला. आता प्राजक्ता एका नवीन प्रवासासाठी सज्ज झाली आहे. ग्रंथाली प्रकाशित ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आली आहे.

या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार श्री.प्रवीण दवणे यांच्या हस्ते झाले. या वेळी अध्यक्षस्थानी ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून अमृता खानविलकर, पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित होते. या व्यतिरिक्त प्राजक्ताचे नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील मित्रपरिवारही तिला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता.

‘प्राजक्तप्रभा’चा सुगंध रसिकांच्या मनात कायम दरवळत राहील!

‘प्राजक्तप्रभा’बाबत ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रवीण दवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले, ”प्राजक्ताला आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री, नृत्यांगना म्हणून ओळखतोच. ‘प्राजक्तप्रभा’च्या माध्यमातून ती एक कवयित्री म्हणून आपल्या समोर आली आहे. प्राजक्ताला कलाकारासोबतच कवयित्री का व्हावेसे वाटले याचे उत्तर ‘प्राजक्तप्रभा’मध्ये दडले आहे. तिचे हळवेपण, संवेदनशीलता या काव्यसंग्रहातून स्पष्ट जाणवते. या झगमगत्या जगापलीकडेही कलावंतांना मन असते, भावना असतात. या भावनांना प्राजक्ताने काव्यस्वरूपात आपल्या समोर आणले आहे. प्राजक्ताच्या या नवीन प्रवासासाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा. पारिजातकाच्या फ़ुलाप्रमाणेच ‘प्राजक्तप्रभा’चा सुगंधही रसिकांच्या मनात कायम दरवळत राहील.”

मी माझ्यासाठी कविता लिहीत होते!

आपल्या या नवीन प्रवासाबद्दल प्राजक्ता माळी सांगते, ”कधी कुठे छापून याव्यात अथवा सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात यासाठी नाही तर मी माझ्यासाठी कविता लिहीत होते. माझा काव्यसंग्रह येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. योगायोगाने हे सर्व जुळून येत आहे. त्यामुळे हा तुमच्याप्रमाणेच मलाही हा एक सुखद धक्का आहे आणि म्हणूनच विशेष आनंदही आहे. संग्रहातील कविता मराठी, हिंदी आणि इंग्रजी असून त्या अत्यंत साध्या आणि सोप्या आहेत. अजिबातच क्लिष्ट नाहीत; त्यामुळेच त्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील, भावतील, आवडतील अशी आशा आहे. आजवर प्रेक्षकांनी माझ्या अभिनयावर, नृत्यावर भरभरून प्रेम केले. वेळोवेळी मला प्रतिक्रियाही दिल्या. मला आशा आहे की, ‘प्राजक्तप्रभा’लाही रसिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतील.”

(Prajakta Mali’s collection of poems ‘Prajaktaprabha’ released)

हेही वाचा :

‘भोंग्याचा आणि धर्माचा काही संबंध असतो का?’ अजाणावर भाष्य करणाऱ्या ‘भोंगा’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस!

‘राणादा’ला मिळाली ‘अंकिता’ची साथ, नवी जोडी, नवा “डाव”

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.