Video : राखं झाली जगन्याची हाय तरी जीता भोळं प्रेयम माझं… शालूच्या झक्कास अदा, चाहते बघताच फिदा!

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘फँड्री’ (Fandry) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पर्दापण करणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात.

Video : राखं झाली जगन्याची हाय तरी जीता भोळं प्रेयम माझं... शालूच्या झक्कास अदा, चाहते बघताच फिदा!

मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘फँड्री’ (Fandry) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पर्दापण करणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. (Rajeshwari Kharat) आपल्या नजरेनेच चाहत्यांना प्रेमात पाडणारी राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. शालू चाहत्यांसाठी नवीन-नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यामध्ये तिची अदा पाहून चाहत्यांच्या काळजाचे पाणी पाणी होत आहे. (Rajeshwari Kharat shared Zakkas dance video)

शालूने काही दिवसांपूर्वी तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन तिचा सुंदरसा फोटो पोस्ट केला होता. ‘आ मेरे दिल मैं बस जा मेरे आशिक़ आवारा’, असं कॅप्शन देऊन तिने आशिक पोरांना प्रेमाची साद घातली होती. साहजिकच पोरांनी शालूच्या फोटोवर उड्या मारल्या. ‘कुणी तोडलंस.. जिंकलंस…. ठार केलंस’ अशा खास कोल्हापुरी अंदाजातल्या कमेंट केल्या… तर काहींनी मात्र शालूची फिरकी घेतली.

अशाच फिरकी घेणाऱ्या चाहत्यांना राजेश्वरीने तिच्या गावरान अंदाजात उत्तर दिलं होत त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. शालूने आपल्या कमेंटमध्ये म्हटंले होते की “नारळ फेकून मारीन आज जर कुणी फालतू कमेंट केल्या तर…”, ही कमेंट करताना तिने नारळ हातात घेतलेला आणखी एक फोटो पोस्ट केला… मग तर काय चाहत्यांची कमेंट करण्यासाठी झुंबड उडाली होती.

संबंधित बातम्या : 

Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

Video | शालूचा किलर डान्स! चाहते म्हणतात, ‘भिरभिर मनाला या घालू कसा बांध गं..?’

Video : ‘हाता तोंडाम्होरं घास परी गिळना, गेला जळून जळून जीवं प्रीत जुळना’; शालूच्या अदांनी चाहत्यांच्या काळजाचे पाणीपाणी

(Rajeshwari Kharat shared Zakkas dance video)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI