‘लिंबू मला मारीला गा, लिंबू मला मारीला…’ या गाण्यासह दीपशाम मंगळवेढेकरांची गाजलेली गाणी माहिती आहेत का?

दीपशाम मंगळवेढेकर यांच्या शेजारी एक देवऋषी राहत होता. (read story behind deepasham mangalvedhekar's famous song)

'लिंबू मला मारीला गा, लिंबू मला मारीला...' या गाण्यासह दीपशाम मंगळवेढेकरांची गाजलेली गाणी माहिती आहेत का?
deepsham mangalvedhekar


मुंबई: ‘माथ्यावर हंडा हाय पाण्याचा’ आणि ‘हे नवं नवं लुगडं’ या गाण्यासह गीतकार दीपशाम मंगळवेढेकर यांचं ‘लिंबू मला मारीला गा, लिंबू मला मारीला’… हे गाणंही तितकंच लोकप्रिय झालं. आजही हे गाणं खेड्यापाड्यात मुंबईतील वस्त्यांमध्ये वाजत असतं. त्यांची इतर गाणीही तितकीच कर्णमधूर आहेत. (read story behind deepasham mangalvedhekar’s famous song)

‘लिंबू मला मारीला’ कसं सूचलं?

दीपशाम मंगळवेढेकर यांच्या शेजारी एक देवऋषी राहत होता. त्याच्याकडे लोक समस्या घेऊन यायचे. त्यामुळे तोही लिंबू वगैरे भारून त्यांना द्यायचा. हा सगळा प्रकार पाहून मंगळवेढेकरांना ‘लिंबू मला मारीला गा…’ हे गाणं सूचलं. हे गाणं सुरुवातीला गायक भगवान लिंगाडे गायचे. हे गाणं आनंद शिंदेंच्या डोक्यात होतं. त्यांना हे गाणं आवडलं होतं. रेकॉर्डिंगवेळी आनंद यांनी मंगळवेढेकरांना हे गाणं मागितलं आणि रेकॉर्डिंग केली. विठ्ठल शिंदे यांनी या गाण्याची चाल बांधली होती. तुफान लोकप्रिय झालेलं हे गाणं नंतर पाच कॅसेट कंपन्यांनी घेतलं. पण मंगळवेढेकरांना रॉयल्टी दिली नव्हती. एचएमव्हीने मात्र कॅसेटवर मंगळवेढेकरांचं नाव टाकलं होतं. हे गाणं होतं…

लिंबू मला मारीला गा, लिंबू मला मारिला,
कुण्या दुश्मनानं सोडिला अन् देवऋषानं भारिला…

गाणं आलं, टीका झाली

हे गाणं आल्यानंतर दीपशाम मंगळवेढेकर आणखीनच प्रकाशझोतात आले. पण त्याचबरोबर त्यांच्यावर टीकाही होऊ लागली. त्यांच्या गाण्यातील शेवटच्या ओळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना खटकल्या आणि त्यावरून त्यांच्यावर टीका झाली. हा व्यवसायाचा भाग असल्याचं सांगूनही लोक ऐकेनात. त्यामुळे काही दिवस त्यांना या टीकेला समोरे जावं लागलं होतं. त्या ओळी होत्या…

मरीआईचा भक्त दीपशाम, त्यानं केलं माझं कामं,
लय झालो होतो जाम, पडला जीवाला आराम,
जाता जाता जीव माझा, देवानच तारीला…

मंगळवेढेकरांची काही गाणी

माथ्यावर हंडा हाय पान्याचा
चालली ठुमकत….

आणि

थांब थांब पोरी, मला पाहू दे तरी, जराशी ये इकडं,
कसं तरी दिसं, आता नीट तरी नेसं, हे नवं नवं लुगडं…

आणि

रुसला शालू, रुसली चोळी, नवलच बाई झालं,
गं बाई माझं अंग अंग शहारून आलं…

आणि

डोलकरा डोलकरा
आयलं तुफान समिंदरा…

आणि

भिजली माझी साडी चोळी, भिजलं माझं अंग
कान्हा नको रे नको टाकू, माझ्यावर रंग…

आणि

विश्वामाजी मिळूनिया सारे,
घुमुया ललकार, भीमाचा करुया जयजयकार… (साभार, आंबेडकरी कलावंत) (read story behind deepasham mangalvedhekar’s famous song)

संबंधित बातम्या:

आनंद शिंदेंचं ‘नवं नवं लुगडं…’ हे गाणं लंडनच्या हॉलमध्येही गाजलं; या गाण्याचे गीतकार कोण?; हा किस्सा वाचाच!

‘माथ्यावर हंडा हाय पान्याचा…’ गाणं गाजलं अन् लग्नही जुळलं; वाचा, ‘या’ गीतकाराच्या आयुष्यातील किस्सा!

दादा कोंडके म्हणाले, ‘तुमची गाणी मला द्या, हवं तेवढं मानधन घ्या’; मग काय झालं?, वाचा!

(read story behind deepasham mangalvedhekar’s famous song)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI