Death Anniversary | खलनायक बनून अवघ्या मनोरंजन विश्वाला लावले वेड, जाणून घ्या अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्याबद्दल…

हिंदी चित्रपटसृष्टीत असे एकापेक्षा एक अभिनेते झाले आहेत, ज्यांनी खलनायकाच्या भूमिका करून वेगळी छाप सोडली आहे. त्या कलाकारांच्या नकारात्मक भूमिका पाहिल्यानंतरही प्रेक्षक त्यांच्यावर प्रेम करत राहतात आणि आजही ते त्यांच्या मनात रुजले आहेत.

Death Anniversary | खलनायक बनून अवघ्या मनोरंजन विश्वाला लावले वेड, जाणून घ्या अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्याबद्दल...
Sadashiv Amrapurkar
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 9:13 AM

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत असे एकापेक्षा एक अभिनेते झाले आहेत, ज्यांनी खलनायकाच्या भूमिका करून वेगळी छाप सोडली आहे. त्या कलाकारांच्या नकारात्मक भूमिका पाहिल्यानंतरही प्रेक्षक त्यांच्यावर प्रेम करत राहतात आणि आजही ते त्यांच्या मनात रुजले आहेत. चित्रपटांमध्ये नायक आणि खलनायक दोघांच्याही भूमिका महत्त्वाच्या असतात. त्यामुळे दोघांची निवड करताना दिग्दर्शकांना खूप विचार करावा लागतो. आज आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत त्यांनी खलनायकाच्या संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. अभिनेते सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar) यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

सदाशिव अमरापूरकर असे अभिनेते होते, ज्यांनी चित्रपटाच्या पडद्यावर आपल्या पात्रांसह प्रेक्षकांच्या टाळ्यांपासून ते हेडलाइन्सपर्यंत भरपूर वाहवा मिळविली. आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने आम्ही तुम्हाला सदाशिव अमरापूरकर यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.

50 नाटकांनंतर चित्रपटात प्रवेश

सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म 11 मे 1950 रोजी अहमदनगर, महाराष्ट्र येथे झाला. एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या सदाशिव यांना त्यांचे जवळचे मित्र प्रेमाने ‘तात्या’ म्हणत. सदाशिव लहानपणापासून असहाय लोकांना मदत करत असत आणि त्यांना सुरुवातीपासूनच अभिनय करण्याची इच्छा होती. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सदाशिव यांनी मराठी नाटकांतून अभिनयाला सुरुवात केली आणि जवळपास 50 नाटकांनंतर चित्रपटांच्या दुनियेत पाऊल ठेवले.

‘किन्नर’ भूमिकेने मिळाली प्रसिद्धी

सदाशिव अमरापूरकर यांचा पहिला चित्रपट ’22 जून 1897′ हा मराठी चित्रपट होता आणि या चित्रपटात त्यांनी बाळ गंगाधर टिळकांची भूमिका केली होती. तर, अभिनेत्याचा पहिला हिंदी चित्रपट ‘अर्ध सत्य’ हा होता. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इतकंच नाही तर ‘सडक’ चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. ‘सडक’ या चित्रपटात सदाशिव आमरापुरकर यांनी ‘किन्नर’ची भूमिका साकारली होती, जी लोकांना खूप आवडली होती.

अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या ‘आखरी रास्ता’ या चित्रपटातील सदाशिव यांच्या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. सदाशिव यांनी बॉलिवूडच्या जवळपास सर्वच सुपरस्टार्ससोबत काम केले होते. यामध्ये धर्मेंद्र, गोविंदा, अमिताभ बच्चनपासून ते आमिर खान, संजय दत्त आणि सलमान खानपर्यंतच्या सगळ्या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे.

धर्मेंद्र यांनी मानले ‘लकी चार्म’

सुपरस्टार धर्मेंद्र यांना त्यांची शैली इतकी आवडली की, सदाशिव त्यांचे आवडता खलनायक बनले. तज्ज्ञ म्हणायचे की, धर्मेंद्र त्यांना स्वतःसाठी ‘लकी’ मानू लागले. यामुळेच सदाशिव अमरापूरकर त्यांच्यासोबत दोन-चार नव्हे, तर तब्बल 11 चित्रपटांमध्ये दिसले.

फुफ्फुसाच्या संसर्गाने झाले निधन

खलनायकाच्या भूमिकेने मने जिंकणारा सदाशिव अमरापूरकर 90च्या दशकात सहकलाकार म्हणूनही थोडे कॉमेडीकडे वळला. त्यांनी ‘आंखे’, ‘इश्क’, ‘कुली नंबर 1’, ‘गुप्त: द हिडन ट्रुथ’, ‘जय हिंद’, ‘मास्टर’, ‘हम साथ-साथ हैं’ सारखे चित्रपट केले. सदाशिव यांचा शेवटचा हिंदी चित्रपट दिबाकर बॅनर्जींचा ‘बॉम्बे टॉकीज’ होता, ज्यात त्यांनी छोटीशी भूमिका साकारली केली होती. सदाशिव यांचे वयाच्या 64व्या वर्षी फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे निदान झाले, ज्यामुळे 3 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांचे निधन झाले.

हेही वाचा :

‘राधा: द इटरनल मेलडी’ या शॉर्ट ॲनिमेशन चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, विजेत्यांचा आमदार सुनिल प्रभूंनी केला सत्कार!

KBC 13 : अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी अमिताभ बच्चनसोबत साजरी करणार दिवाळी!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.