मुंबई : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं (Ganpati Bappa) आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा बाप्पाच्या भक्तांनी त्यांच्या आगमनाची तयारी प्रत्येक घरा-घरात, राज्यातच नाही तर जगभरात सुरु केली आहे. गणपती बाप्पा बुद्धीचं, विद्येचं आणि कलेचं दैवत आहे. संगीत क्षेत्रासाठी सुद्धा बाप्पा म्हणजे नेहमीच एक पर्वणी असते. बाप्पाची नानाविध रूपं आहेत. नानाविध प्रकारे बाप्पाची पूजा केली जाते. कोकणातील लोकांसाठी हा गणपतीचा म्हणजेच चतुर्थीचा सण अगदी जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि अभिमानाचा विषय असतो. म्हणूनच दरवर्षी मुंबईतले सगळे चाकरमानी गणपतीसाठी अगदी जय्यत तयारी करून कोकणची वाट धरतात.