Aai Kuthe Kay Karte | आपल्या आईला अनिरुद्धसोबत पूजेला बसलेलं पाहून भाबड्या निखिलच्या मनात प्रश्नाचं काहूर! सुटेल का त्याचा गुंता?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte ) सध्या प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. मालिकेच्या कथानकाने सध्या अतिशय रंजक वळण घेतलं आहे. संजनाने साम-दाम-दंड-भेद वापरून अनिरुद्धशी लग्न करून देशमुखांच्या घरात संसार थाटला आहे.

Aai Kuthe Kay Karte | आपल्या आईला अनिरुद्धसोबत पूजेला बसलेलं पाहून भाबड्या निखिलच्या मनात प्रश्नाचं काहूर! सुटेल का त्याचा गुंता?
आई कुठे काय करते

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte ) सध्या प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. मालिकेच्या कथानकाने सध्या अतिशय रंजक वळण घेतलं आहे. संजनाने साम-दाम-दंड-भेद वापरून अनिरुद्धशी लग्न करून देशमुखांच्या घरात संसार थाटला आहे. यानंतर आता देशमुखांच्या कुटुंबाची सूत्र एकहाती घेण्यासाठी संजनाची धडपड सुरु आहे. मात्र, या सगळ्यात तिला आपल्या लेकाचा अर्थात निखिलचा विसर पडला आहे. आता निखिल देखील आपल्या आईला भेटायला ‘समृद्धी’मध्ये येणार आहे. मात्र, त्याच्या येण्याने आता नात्यांचा गुंता वाढणार आहे.

मालिकेच्या येत्या एपिसोडमध्ये दाखवले जाणार आहे की, संजना आणि शेखर यांचा मुलगा निखिल आईला भेटायला देशमुखांच्या घरात येणार आहे. याचवेळी घरात गोकुळाष्टमी निमित्ताने ‘कृष्ण जन्म’ सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी होणाऱ्या पूजेला बसण्यासाठी संजना घरातल्यांचं मन वळवणार आहे. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या लहानग्या निखिलला आता प्रश्न पडलाय की, अनिरुद्ध काकांबरोबर आपली आई का पूजेला बसलीय? हा प्रश्न विचारत तो अरुंधतीला अनिरुद्धसोबत पुजेस बसण्यास सांगणार आहे. अर्थात घडल्या प्रकारची त्याला काहीच कल्पना नाहीय. यामुळे आता त्याला उत्तरं कशी द्यायची हा मोठा प्रश्न संजना आणि अनिरुद्ध समोर उभा राहणार आहे.

पाहा नवा प्रोमो :

अरुंधती झाली ‘समृद्धी’ची मालकीण

संजना घरात आल्यानंतर आता अप्पांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने देशमुखांच्या कुटुंबात राहावं, ती इथे राहिल्यानेच घरात शांतता नांदेल, असा विचार करणाऱ्या अप्पांनी देशमुखांचा ‘समृद्धी’ बंगला आता अनिरुद्ध आणि अरुंधती या दोघांच्याही नावावर समान वाटला आहे. अर्थात आता अरुंधती देखील या अर्ध्या घराची मालकीण झाली आहे. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा देशमुखांच्याच घरात राहणार आहे.

संजनाला भरला सज्जड दम

मालिकेच्या नुकत्याच झालेल्या एका भागात अरुंधती संजनाला चांगलाच दम भरताना दिसली आहे. सकाळची काम उरकण्यासाठी अरुंधतीची लगबग सुरु असते. यावेळी ती अनिरुद्धच्या बेडरूम जवळ येते. आणि अचानक त्याचवेळी अनिरुद्ध देखील दरवाजा उघडतो. त्यावेळी संजना तिला तू मुद्दाम आमच्या बेडरूमला कान लावून ऐकत होतीस, असं म्हणते. त्यावर अप्पांनी हे घर माझ्यानावावर देखील केलं आहे, असं म्हणत, या घरात राहण्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही!, असा दम अरुंधती संजनाला भरते. यानंतर आता देशमुखांच्या घरात अरुंधती विरुद्ध संजना असा नवीन संघर्ष पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

मराठी मनोरंजन विश्वातील ‘या’ प्रसिद्ध जोडीच्या घरी ‘गुड न्यूज’, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो!

Suyash Tilak : ‘आज हा प्रवास संपला; म्हणजे ‘बिग बॅास’मध्ये जातोय असं नाहीये’, ‘शुभमंगल ऑनलाईन’साठी सुयश टिळकची खास पोस्ट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI