मराठी मनोरंजन विश्वातील ‘या’ प्रसिद्ध जोडीच्या घरी ‘गुड न्यूज’, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो!

‘देवयानी’ फेम अभिनेता संग्राम साळवी आणि त्याची पत्नी अभिनेत्री खुशबू तावडे यांनी चाहत्यांसोबत ‘गुड न्यूज’ शेअर केली आहे. लवकरच या जोडीच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. बेबी बंप दाखवतानाचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे.

1/6

2/6
संग्राम साळवी आणि खुशबू तावडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी आणि एक खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोवर चाहते आणि कलाकारांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

3/6
‘होणाऱ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला त्रास देणारा आता मी एकटाच नाहीय! माझ्या सर्व गुन्ह्यांमध्ये साथ देणाऱ्या चिमुकल्या पार्टनरची आतुरतेने वाट पाहतोय’, असं कॅप्शन संग्रामने दिलंय, तर, ‘आम्ही आमच्या कुटुंबात आणखी थोडं प्रेम अ‍ॅड करत आहोत’, असं खास कॅप्शन खुशबूने दिलं आहे.

4/6
खुशबू आणि संग्रामच्या फोटोवर अभिज्ञा भावे, मयुरी देशमुख, तेजस्वीनी पंडीत, श्रेया बुगडे, सुयश टिळक आणि अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर, अखेर आनंदाची बातमी जाहीर झालीच, आता आम्ही सगळ्यांना सांगू शकतो, अशी खास कमेंट अभिनेत्री अभिज्ञा भावेने केली आहे.

5/6
2018मध्ये खुशबू आणि संग्राम लग्नबेडीत अडकले होते. संग्रामने ‘देवयानी’, ‘मी तुझीच रे’, ‘आई माझी काळूबाई’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

6/6
तर, अभिनेत्री खुशबू तावडे देखील ‘एक मोहोर अबोल’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘पारिजात’ या मालिकांमध्ये झळकली आहे. खुशबूने ‘तारक मेहता...’मालिकेत साकारलेली ‘बुलबुल’ देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI