केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या; नोकरीच्या चिंतेने उचललं टोकाचं पाऊल

इंटर्नशिप प्रोग्राममध्ये अपयशी ठरल्यानंतर प्लेसमेंटच्या चिंतेने त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं कळतंय. पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये तो कम्प्युटर इंजीनिअरिंगचं (engineering student) शिक्षण घेत होता.

केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या; नोकरीच्या चिंतेने उचललं टोकाचं पाऊल
Ketaki Mategaonkar, Akshay Mategaonkar
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 18, 2022 | 10:33 AM

लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या (Ketaki Mategaonkar) कुटुंबाशी निगडीत धक्कादायक बातमी समोर येत आहे. केतकीच्या चुलत भावाने पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केली. केतकीचा चुलत भाऊ अक्षय माटेगावकर (Akshay Mategaonkar) हा पुण्यात इंजीनिअरिंगचं शिक्षण घेत होता. इंटर्नशिप प्रोग्राममध्ये अपयशी ठरल्यानंतर प्लेसमेंटच्या चिंतेने त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं कळतंय. पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये तो कम्प्युटर इंजीनिअरिंगचं (engineering student) शिक्षण घेत होता. अक्षय 21 वर्षांचा होता. आत्महत्येपूर्वी त्याने कुटुंबीयांसाठी चिठ्ठी लिहित माफी मागितली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

अक्षय त्याच्या आईवडिलांसोबत पुण्यात राहत होता. आठव्या मजल्यावरील घरातील बाल्कनीतून उडी मारून त्याने आपलं आयुष्य संपवलं. अक्षयने त्याच्या पालकांसाठी एक सुसाईड नोट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने नमूद केलं आहे की तो त्याच्या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही आणि एका नामांकित कंपनीमध्ये प्लेसमेंट न मिळण्याच्या भीतीमुळे त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिली सूसाईड नोट

आत्महत्येपूर्वीच्या या चिठ्ठीत पुढे त्याने असंही लिहिलं की त्याने इंटर्नशिप प्रोग्राममध्ये यशस्वी ठरण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले होत. परंतु तो त्याच्या कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. अक्षयने लिहिलं की, या घटनेनंतर त्याला त्याच्या पालकांना सामोरं जाण्याची भीती वाटत होती आणि आत्महत्या हाच एकमेव पर्याय त्याच्यासमोर शिल्लक होता. केतकी माटेगावकर सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी लॉस एंजिलिसमध्ये असून तिने अद्याप या घटनेबद्दल तिची प्रतिक्रिया दिली नाही.