Sonalee Kulkarni: मराठी कलाविश्वात पहिल्यांदाच होणार असं; सोनाली कुलकर्णीने लग्नाच्या व्हिडीओबद्दल केला खुलासा

मे 2021 मध्ये कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे सोनाली आणि कुणालने नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दोघांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साग्रसंगीत लग्नसोहळ्यात पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली.

Sonalee Kulkarni: मराठी कलाविश्वात पहिल्यांदाच होणार असं; सोनाली कुलकर्णीने लग्नाच्या व्हिडीओबद्दल केला खुलासा
Sonalee Kulkarni, Kunal Benodekar
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 02, 2022 | 6:12 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) गेल्या वर्षी दुबईतील (Dubai) एका मंदिरात कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) याच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र खऱ्या अर्थाने सोनालीचा लग्नसोहळा हा गेल्या महिन्यात पार पडला. मे 2021 मध्ये कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे सोनाली आणि कुणालने नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दोघांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साग्रसंगीत लग्नसोहळ्यात पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली. याविषयी सोनाली नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. “कोरोना महामारीदरम्यान आम्ही रजिस्टर मॅरेज केलं. मी दुबईत अडकले होते आणि लग्नाच्या नोंदणीशिवाय मी तिथे राहू शकले नसते. लग्नाचे विधी आम्ही त्यावेळी करू शकलो नव्हतो. आमचे कुटुंबीयही तेव्हा उपस्थित नव्हते”, असं तिने सांगितलं.

गेल्या महिन्यात लंडनमध्ये कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत सोनालीने लग्न केलं. मात्र या लग्नाचे फोटो किंवा व्हिडीओ अद्याप समोर आले नाहीत. “मला सर्व विधींमध्ये विश्वास आहे. सर्व विधींसह लग्न व्हावं अशी माझी इच्छा होती. जोपर्यंत ते विधी पार पडले नाहीत, तोपर्यंत मला लग्न केल्यासारखं वाटलंच नाही”, असं ती ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. सोनालीच्या लग्नाचा व्हिडीओ हा लवकरच एका मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. “मराठी कलाविश्वात असं कोणीच अद्याप केलं नाही. त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे”, अशा शब्दांत सोनालीने भावना व्यक्त केल्या.

पहा फोटो-

लग्नानंतर सोनाली आणि कुणाल मेक्सिकोला हनिमूनसाठी गेले. या हनिमूनचे फोटो आणि व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. सोनाली नुकतीच ‘पांडू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिचा ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.