Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा नवरा पूर्ण करू शकेल?; ‘बाई गं’ चित्रपटाचा धमाल ट्रेलर

Swapnil Joshi Prarthana Behere Bai G Movie Trailer : 'बाई गं' चित्रपटाचा धमाल ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ट्रेलरमुळे सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे. या सिनेमात सहा अभिनेत्री तर एक अभिनेत आहे. वाचा सविस्तर...

5 जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा नवरा पूर्ण करू शकेल?; 'बाई गं' चित्रपटाचा धमाल ट्रेलर
'बाई गं' चित्रपटाचा धमाल ट्रेलर रिलीजImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 7:43 PM

अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांचा नवा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ‘बाई गं’ चित्रपटाचा धमाल ट्रेलर रिलीज झाला आहे. पाच जन्मांच्या बायका अन् त्यांच्या अपूर्ण इच्छा… त्यांचा नवरा पूर्ण करू शकेल का? ‘बाई गं’ या सिनेमात नात्यांमधली गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. नवरा बायकोचं नातं म्हणजे, दोघांसाठी संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच, असंच काहीसं घडलंय स्वप्निल जोशी सोबत… वर्तमान आयुष्यात तरी त्याला बायकोचं मन काही कळालं नाही. मागच्या पाच जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा तो कसा पूर्ण करतो, हे पाहणं महत्वाचं असेल.

सिनेमाची गोष्ट काय?

‘बाई गं’ या भन्नाट चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीझ झालाय. या ट्रेलरमध्ये स्वप्निल जोशीची तारेवरची कसरत पाहायला मिळत आहे. कॉमेडी आणि भावनेने भरपूर असा हा ट्रेलर आहे. यात शेवटी स्वप्नीलला बाईच्या मनाला समजायला ‘बाई चं’ रूप घ्यावं लागतंय. आता या चित्रपटाचा शेवट नक्की काय असेल हे पाहणं रोमांचक ठरणार आहे.

स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांचा संसार, त्यातील अडचणी अन् मागच्या जन्मीच्या बायका… या सगळ्यात स्वप्नील जोशीची होणारी धावपळ अशी या सिनेमाची गोष्ट आहे. हा सिनेमा 12 जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल.

कोण- कोण कलाकार सिनेमात आहेत?

या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहेत. ‘बाई गं’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केलं आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केलं आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ हा चित्रपट 12 जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.