‘झॉलीवूड’ दिग्दर्शक तृषांत इंगळेची अभिनयात एंट्री, ‘मिडनाइट दिल्ली’मध्ये साकारणार प्रमुख भूमिका!

‘झॉलिवूड’ या मराठी चित्रपटातून तृषांत इंगळेनं (Trishant Ingle) दिग्दर्शकीय वाटचाल सुरू केली होती. आता तृषांत अभिनयात पदार्पण करत असून, ‘मिडनाइट दिल्ली’ या हिंदी चित्रपटात त्याची प्रमुख भूमिका साकारणार आहे.

‘झॉलीवूड’ दिग्दर्शक तृषांत इंगळेची अभिनयात एंट्री, ‘मिडनाइट दिल्ली’मध्ये साकारणार प्रमुख भूमिका!
Trushant Ingale


मुंबई : ‘झॉलिवूड’ या मराठी चित्रपटातून तृषांत इंगळेनं (Trishant Ingle) दिग्दर्शकीय वाटचाल सुरू केली होती. आता तृषांत अभिनयात पदार्पण करत असून, ‘मिडनाइट दिल्ली’ या हिंदी चित्रपटात त्याची प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘मिडनाइट दिल्ली’ या चित्रपटाची इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल बोस्टन, शिकागो साऊथ एशिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली असून, 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत हा फेस्टिवल रंगणार आहे.

तृषांतनं ‘झॉलिवूड’ या चित्रपटाद्वारे लक्ष वेधून घेतलं होतं. झाडीपट्टी रंगभूमीवर हा चित्रपट बेतलेला होता. ‘न्यूटन’, ‘सुलेमानी किडा’ असे उत्तम चित्रपट केलेला अमित मसूरकर ‘झॉलिवूड’ चित्रपटाचा क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, प्रस्तुतकर्ता आहे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ‘झॉलिवूड’ची निवड झाली होती.

अभिनय क्षेत्रात पदार्पण

दिग्दर्शनाचा अनुभव घेतल्यानंतर आता ‘मिडनाइट दिल्ली’ या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण करण्याविषयी तृषांत सांगतो की, ‘आयुष्य हे अनिश्चित आहे आणि पुढच्या क्षणी आपल्याबरोबर किंवा आपल्या प्रिजयनांबरोबर काय घडेल हे सांगता येत नाही. अशीच एक गोष्ट ‘मिडनाइट दिल्ली’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. राकेश रावतनं ‘मिडनाइट दिल्ली’चं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात माझी भूमिका एका सर्वसामान्य माणसाची आहे. आर्थिक देणी असलेला हा माणूस एका अडचणीत सापडल्यावर हिंसेच्या आहारी जातो. अतिशय मजेशीर अशी भूमिका आहे. या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली याचा मला खूप आनंद आहे.’

झाडीपट्टी नाटकांतून बालकलाकार म्हणून काम!

चित्रपटाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेने स्वतः झाडीपट्टी नाटकांतून बालकलाकार म्हणून काम केले आहे. विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. या प्रकारावर पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती होत आहे. चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या इराद्याने तृषांतने 16व्या वर्षी मुंबई गाठली. त्यानंतर लेखन, कास्टिंग डिरेक्शनचा अनुभव घेत आता ‘झॉलीवूड’ या चित्रपटाच्या रुपाने त्याने पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सुलेमानी किडा, न्यूटन या चित्रपटातून अमित मसूरकर यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘झॉलीवूड’ या चित्रपटाला फ्रान्समधील इंडियन फेस्टिव्हल ऑफ तौलौसमध्ये स्पेशल ज्युरी अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे.

(Zollywood film director Trishant Ingle  entry in Acting will play a major role ‘Midnight Delhi’)

हेही वाचा :

Raj Kundra | हातात प्लास्टिकची पिशवी अन् डोळ्यात अश्रू, दोन महिन्यांनी तुरुंगाबाहेर येताना ‘अशी’ होती राज कुंद्राची अवस्था!

‘भरत जाधवने आज रडवलं यार…’, चाहत्याकडून मिळालेलं कौतुक शेअर करत भरत जाधव म्हणतात…

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी, ‘हे’ स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट!

राज कुंद्राच्या जामीनानंतर शिल्पा शेट्टीची सोशल मीडिया पोस्ट, चाहत्यांमध्ये सुरुये जोरदार चर्चा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI