Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी, ‘हे’ स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट!

मराठी मनोरंजन विश्वातील 15 चर्चित नाव या घरात नांदणार आहेत. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे.

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी, ‘हे’ स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट!
Bigg Boss Marathi

मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाचा ग्रँड प्रिमिअर 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता पार पडला आहे. आपल्या खास शैलीत ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची शाळा घेणारे दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘कलर्स मराठी’वरील या धमाकेदार रिअॅलिटी शोचे शानदार प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले होते. आता या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील 15 चर्चित नाव या घरात नांदणार आहेत. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे.

पहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क

‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश होताच पहिल्याच दिवशी या 15 स्पर्धकांना नॉमिनेशन टास्क देण्यात आला. टाकाऊ-टिकाऊ असे या तस्कचे नाव होते. या टास्कमध्ये विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ बेघर होण्याच्या पुढच्या फेरीसाठी नॉमिनेट झाले आहेत.

मीरामुळे वादाची ठिणगी

या वेळी बिग बॉसमराठी महिला विशेष थीमवर आधारित आहे. यामध्ये प्रत्येक महिला स्पर्धकाला घरातील एक जागेचा मालक घोषित करण्यात आले आहे. तर, प्रत्येक पुरुष स्पर्धकाला त्यांचे सेवक म्हणून काम करावे लागणार आहे. यात मीरा जगन्नाथ हिच्याकडे बेडरूमची जबाबदारी आली आहे. तर, ती घरात मी बेडरूमची मालकीण या आवेशात वावरत आहे. पुरुष स्पर्धक जय दुधाणे याने बेडवर ठेवलेला टॉवेल पाहून मीराने त्याला तो तिथून उचल असे म्हटले. यावरून त्या दोघांमध्ये चांगलीच जुंपली होती.

तर, दुसरीकडे अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्यावर किचनची जबाबदारी होती. यावेळी अन्न कमी पडल्याने मीराने तिला देखील बोल लावायला सुरुवात केली होती. यावेळी दोघींमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. या प्रसंगी स्नेहाला रडू कोसळलं होतं.

मराठीतील 15 सेलिब्रेटींचा सहभाग

बिग बॉस मराठी कार्यक्रमात इतर बिग बॉस कार्यक्रमाप्रमाणे मनोरंजन क्षेत्रातील 15 सेलिब्रेटी 100 दिवसांपेक्षा जास्त काळ बिग बॉसच्या घरात बंद राहतील. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण कलर्स मराठी या वाहिनीवर दररोज रात्री 9 वाजता होईल. याशिवाय वूटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारेदेखील हा कार्यक्रम पाहायला मिळेल.

हेही वाचा :

Kareena Kapoor Khan | पहिल्यांदा दिला होता नकार, मग सैफ अली खानशी लग्न करण्यापूर्वी करीना कपूरने ठेवल्या होत्या अटी!

Kareena Kapoor Khan | पहिल्यांदा दिला होता नकार, मग सैफ अली खानशी लग्न करण्यापूर्वी करीना कपूरने ठेवल्या होत्या अटी!

Happy Birthday Rimi Sen | अभिनय विश्वापासून दूर जात राजकारणात उतरली होती रिमी सेन, पाहा कसा होता अभिनेत्री चित्रपट प्रवास

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI