Mulshi Pattern | खतरनाक….! एक-दोन नव्हे, तब्बल तीन दाक्षिणात्य भाषांत ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक येणार

आता ‘मुळशी पॅटर्न’ आणखी तीन दाक्षिणात्य भाषांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा स्वतः प्रवीण तरडे सांभाळणार आहेत.

Mulshi Pattern | खतरनाक....! एक-दोन नव्हे, तब्बल तीन दाक्षिणात्य भाषांत ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक येणार

मुंबई : अभिनेता-लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ (Marathi Film Mulshi Pattern) हा चित्रपट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट त्या वर्षातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. नुकतीच या चित्रपटाच्या हिंदी रीमेकची घोषणादेखील झाली होती. ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या हिंदीतील ‘मुळशी पॅटर्न’मध्ये अभिनेता आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याचबरोबर आता ‘मुळशी पॅटर्न’ आणखी तीन दाक्षिणात्य भाषांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा स्वतः प्रवीण तरडे सांभाळणार आहेत (Marathi Film Mulshi Pattern  remake in three south indian language).

ज्या शेतकर्‍यांनी आपली जमीन बांधकाम व्यावसायिकांना विकली आणि त्यांना बचतीची माहिती नसल्यामुळे लवकरच दारिद्र्यात ढकलले गेले अशा शेतकऱ्यांसमोर भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. गुन्हेगारी विश्वात सक्रिय असलेल्या कुटुंबातील तरुण पिढीविषयीही यात भाष्य केले गेले आहे.

दिग्दर्शन-लेखनाची धुरा प्रवीण तरडेंकडेच!

या चित्रपटांबद्दल प्रवीण तरडे यांनी एका प्रसिद्ध वेब साईटला मुलाखत दिली. चित्रपटांविषयी सांगताना प्रवीण तरडे म्हणतात, ‘तेलुगु, तमिळ आणि कन्नड या तीन दक्षिण भारतीय भाषांमध्ये या चित्रपटाचा पुनर्निर्मिती होत आहे. अभिनेता देव गिलसह मी या प्रोजेक्टवर काम करत आहे. मी हिंदी आवृत्तीशी संबंधित नसलो तरी (आयुष शर्मा अभिनित हिंदी रिमेकचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत.), दक्षिण आवृत्त्यांमध्ये दिग्दर्शन, लेखन आणि अभिनय करणार आहे.’

दक्षिणेतल्या लोकांचा, तिथल्या प्रेक्षकांचा या चित्रपटाशी संबंध आहे का?, असे विचारले असता, प्रवीण तरडे म्हणतात, ‘पुण्यातील मुळशीप्रमाणेच बेंगळुरू आणि चेन्नई येथील शेतकऱ्यांचीही परिस्थिती तशीच आहे. जिथे पूर्वी शेती होती, तिथे आता आयटी पार्क आणि उद्योग सुरू झाले आहेत. हा विषय संपूर्ण देशाशी संबंधित आहे.’ तर बहुतेक कलाकार हे मराठी चित्रपटातीलच असतील, अशी माहितीही त्यांनी दिली (Marathi Film Mulshi Pattern  remake in three south indian language).

स्वतःच्या भुमिकेविषयी सांगताना ते म्हणाले की, ‘मी या चित्रपटात एका इन्स्पेक्टरची भूमिका साकारणार आहे. तर चित्रपटातील मुख्य कलाकार दाक्षिणात्य असतील.’

नव्या वर्षात नवे चित्रपट..

प्रवीण तरडे सध्या एकाच वेळी अनेक नव्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी ‘देऊळ बंद’ या मराठी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. तसेच त्यांचा आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून, तो प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. लवकरच ते ‘कोल्हापूर टू बुलढाणा व्हाया इस्त्राईल’ या प्रेमकथेवर आधारित चित्रपटाचे काम सुरू करणार आहेत. या चित्रपटात कोल्हापुरातील एक मुलगा आणि बुलढाणा येथील एक मुलगी यांची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.

(Marathi Film Mulshi Pattern  remake in three south indian language)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI