मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघात फूट, नव्या संघटनेची स्थापना; खोपकर, मांजरेकर, दामले पदाधिकारी

महेश मांजरेकर, सुनील बर्वे, लता नार्वेकर, प्रशांत दामले यासारख्या दिग्गज निर्मात्यांनी राजीनामा नव्या निर्माता संघटनेची स्थापना केली आहे

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघात फूट, नव्या संघटनेची स्थापना; खोपकर, मांजरेकर, दामले पदाधिकारी

मुंबई : मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघात फूट पडल्याचे चित्र आहे. महेश मांजरेकर, सुनील बर्वे, लता नार्वेकर, प्रशांत दामले यासारख्या दिग्गज निर्मात्यांनी राजीनामा देत नव्या निर्माता संघटनेची स्थापना केली आहे. ‘नाट्यधर्मी निर्माता संघटना’ असे नव्या संघटनेचे नामकरण करण्यात आले असून अध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. (Marathi Natyadharmi Nirmata Sanghatana)

मराठीतील अनेक दिग्गज निर्मात्यांनी ‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघटने’च्या सदस्यपदाचा राजीनामा देऊन वेगळी संघटना स्थापन करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पुढच्या आठवड्यात या संघटनेची घोषणा होणार आहे. नव्या संघटनेच्या संभाव्य कार्यकारिणीची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती आली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघटनेचे अध्यक्ष अजित भुरे, उपाध्यक्ष विजय केंकरे, काेषाध्यक्ष वैजयंती आपटे यांनी यापूर्वीच राजीनामे दिले आहेत, तर प्रशांत दामले, सुनील बर्वे, लता नार्वेकर, श्रीपाद पद्माकर, नंदू कदम, राकेश सारंग, अनंत पणशीकर, चंद्रकांत लाेहाेकरे, महेश मांजरेकर, दिलीप जाधव यांनी मंगळवारी राजीनामे दिले.

नाट्यधर्मी निर्माता संघटना – संभाव्य कार्यकारिणी

अध्यक्ष : अमेय खोपकर

उपाध्यक्ष : महेश मांजरेकर

कार्यवाह : दिलीप जाधव

सहकार्यवाह : श्रीपाद पद्माकर

खजिनदार : चंद्रकांत लोकरे

प्रवक्ता : अनंत पणशीकर

कार्यकारी सदस्य : सुनील बर्वे, नंदू कदम

सन्माननीय सल्लागार : लता नार्वेकर, प्रशांत दामले

वेगळी चूल का?

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या नाट्य निर्मात्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने घेतला होता. मात्र ज्या 28 निर्मात्यांना आर्थिक मदत केली गेली, त्यापैकी एकाही निर्मात्यांने गेल्या 10 वर्षात एकही नाटक रंगभूमीवर आणलेलं नाही.

हेही वाचा : मराठमोळी अभिनेत्री आणि संगीतकाराचे शुभमंगल!

या सरसकट मदतीवर संघटनेचे सदस्य असलेल्या अनेक निर्मात्यांचा आक्षेप होता. “नाट्य व्यावसायिक निर्मात्यांना मदत देण्यास काेणताही आक्षेप नव्हता. पण गेल्या काही वर्षांत एकही नाटक न केलेल्या व्यक्तींना बेकायदा मार्गाने पैसे देणार असाल तर त्याला पाठिंबा कसा देणार? असा सवाल प्रशांत दामले यांनी उपस्थित केला होता. त्यातूनच मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघात फूट पडल्याचे चित्र आहे.

(Marathi Natyadharmi Nirmata Sanghatana)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI