‘साथ दे तू मला’ फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचा साखरपुडा

वेदांगी कुलकर्णीने सूर राहू दे, साथ दे तू मला यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. (Marathi Actress Vedangi Kulkarni Engagement )

'साथ दे तू मला' फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचा साखरपुडा
अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 10:58 AM

मुंबई : ‘साथ दे तू मला’, ‘सूर राहू दे’ यासारख्या मालिकांमधून छाप पाडणारी लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी (Vedangi Kulkarni) हिचा साखरपुडा झाला. वेदांगीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. (Marathi TV Actress Vedangi Kulkarni Engagement Photos)

वेदांगीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुडा सोहळ्याचे चार फोटो शेअर केल आहेत. ‘अनंतकाळाची नवी सुरुवात’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. गेल्या शुक्रवारी (19 मार्च) पुण्यात वेदांगीचा साखरपुडा झाला. चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

वेदांगीने आपल्या होणाऱ्या अहोंचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवलं आहे. इन्स्टाग्रामवर वेदांगीने त्याला टॅग न केल्यामुळे चाहतेही त्याचं नाव जाणून घेण्यास उत्सुक आहेत. वेदांगीचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज, हेही स्पष्ट झालेलं नाही.

कोण आहे वेदांगी कुलकर्णी?

वेदांगीने झी युवा वाहिनीवरील सूर राहू दे, तर स्टार प्रवाह वाहिनीवरील साथ दे तू मला यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. साथ दे तू मला मालिकेत वेदांगीने प्राजक्ताची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. याशिवाय झी मराठीवरील डान्स महाराष्ट्र डान्समध्येही ती सहभागी झाली होती.

(Marathi TV Actress Vedangi Kulkarni Engagement Photos)

लंडनच्या आजीबाई या नाटकात वेदांगीने काम केले होते. इन्स्टाग्रामच्या माध्यामातून वेदांगी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. डान्स ही आपली पॅशन, तर अभिनय हा श्वास असल्याचं वेदांगीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर लिहिलं आहे.

संबंधित बातम्या 

अजिंक्य देव-लक्ष्मीकांत बेर्डेंची हिरोईन ते काकीसाहेब, पूजा पवार यांची कारकीर्द ‘लय भारी’

(Marathi TV Actress Vedangi Kulkarni Engagement Photos)

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.