Aai Kuthe Kay Karte | सेटवर वडिलांच्या निधनाची बातमी, अभिनेते महाबोले म्हणाले सीन पूर्ण करणारच

आई कुठे काय करते मालिकेत अप्पांची भूमिका करणारे अभिनेते किशोर महाबोले यांच्या वडिलांचे निधन झाले. (Aai Kuthe Kay Karte Kishor Mahabole)

Aai Kuthe Kay Karte | सेटवर वडिलांच्या निधनाची बातमी, अभिनेते महाबोले म्हणाले सीन पूर्ण करणारच
Aai Kuthe Kay Karte
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 12:34 PM

मुंबई : ‘शो मस्ट गो ऑन’ हे ब्रिद जणू रंगदेवतेनेच अनेक कलाकारांच्या भाळी लिहिलं आहे. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात कठीण प्रसंग आला, तरी रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एका डोळ्यातले ‘आसू’ लपवत, चेहऱ्यावर उसने ‘हासू’ असल्याचा अभिनय कलाकारांना करावा लागतो. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत (Aai Kuthe Kay Karte) अप्पांची भूमिका साकारणारे प्रख्यात अभिनेते किशोर महाबोले (Kishor Mahabole) यांच्या वाट्यालाही असाच क्षण आला. मात्र त्यांनीही मालिकेचं शूटिंग पूर्ण करण्यावर भर दिला. (Marathi TV Serial Aai Kuthe Kay Karte Actor Kishor Mahabole lost Father completes Scene before leaving tells Marathi Actor Milind Gawali)

अभिनेते किशोर महाबोले यांच्या वडिलांचे दोन आठवड्यांपूर्वी निधन झाले. आपल्या वडिलांविषयी दुःखद बातमी कळल्यानंतरही महाबोलेंमधील कलाकार जागा होता. सगळं दुःख आतमध्ये ठेवून, चेहऱ्यावर आनंदी भाव आणत त्यांनी मालिकेतील एक मिश्किल सीन चित्रित केला. मनामध्ये वादळ असतानाही आपण शांत आणि आनंदी असल्याचा अभिनय केला आणि आणि मगच ते निघाले. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अप्पांच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या अनिरुद्धने अर्थात प्रख्यात अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर आपले ‘ऑनस्क्रीन वडील’ ‘ऑफस्क्रीन पुत्र’ म्हणून कसे आहेत, हे सांगितलं.

मालिकेचं शूटिंग सिल्व्हासाला

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मालिकांचं शूटिंग सध्या राज्याबाहेर हलवण्यात आलं आहे. ‘आई कुठे काय करते’चं शूट सध्या सिल्व्हासा येथे होत आहे. अभिच्या साखरपुड्याच्या निमित्ताने देशमुख मंडळी मुंबई सोडून गावातल्या घरी राहायला आल्याचा बदल कथानकात करण्यात आला आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य मालिकेत दिसत असताना मिश्किल भूमिकेने लक्ष वेधून घेणाऱ्या आप्पांची अनुपस्थिती सर्वांना जाणवत होती. आप्पा तात्यांकडे राहायला गेल्याचं मालिकेत दाखवलं असलं, तरी पितृशोक झाल्याने किशोर महाबोलेंना काही काळ मालिकेचं शूटिंग करता आलं नाही. सिल्व्हासाला निघण्यापूर्वीच ही बातमी आली होती.

अभिनेते मिलिंद गवळी यांची इन्स्टाग्राम पोस्ट

आप्पा आणि अनिरुद्ध देशमुख जवळजवळ दीड वर्ष बाप आणि मुलगा… आई कुठे काय करते या सिरीयलमध्ये मनातल्या भावनांशी खेळत आहेत, अनिरुद्धचा आप्पांवर खूप जीव, प्रेम आहे. आप्पांची भूमिका करणाऱ्या किशोर महाबोले यांच्यावर मिलिंद गवळीचा जीव आहे, आदर आहे, प्रेम आहे, खूप शिकायला मिळालं या दीड वर्षाच्या काळात. असंख्य कविता त्यांच्या मुखोद्गत आहेत, व. पु. काळे तोंडपाठ आहेत, सगळ्यांनाच प्रश्न पडतो मोठमोठे डायलॉग त्यांचे असे पाठ असतात. अतिशय बुद्धिमान, मेहनती आणि हसमुख, आप्पांशिवाय सेटवर कोणालाच करमत नाही, आप्पा हे किरदार सगळ्यांनाच आवडतं. त्यात खूप किशोर महाबोले आहेत, असं मिलिंद गवळींनी लिहिलं आहे.

माझी आणि त्यांची ओळख आई कुठे काय करतेच्या सेटवरच झाली, पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या मिश्किल स्वभावाने मन जिंकून घेतलं, अतिशय शांत आणि हसमुख स्वभाव, पण एकदा जर तार सटकली, मग कोणाच्या बापाला ते ऐकत नाहीत. या दीड वर्षांमध्ये एकदा दोनदाच सटकली होती आणि क्षणात शांतही झाले आणि कारण काय तर कोणी तरी त्यांचं चार्जर लंपास केलं आणि त्यांना त्यांचा मोबाईल चार्ज करता आला नाही आणि त्यांच्या बायकोशी त्यांना बोलता आलं नाही, म्हणून ती तार सटकली होती, त्या दिवशी कळलं की बायकोवर किती किती प्रेम आहे आणि किती ते तिला मिस करतात, त्यांच्या मिसेसने त्यांना एखादी गोष्ट सांगितली, तर जग इकडचं तिकडे झालं तरी ते ती ऐकतात, त्यांचा शब्द पाळत, किशोरजींना एकुलती एक मुलगी आहे, तिच्यावर ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी अवलंबून असतात, ती म्हणेल तसं ते करतात, असंही मिलिंद गवळींनी लिहिलंय.

काय घडलं त्या दिवशी?

छोटंसं सुखी कुटुंब, कौटुंबिक माणसाने कसे राहावे हे आप्पांकडून शिकण्यासारखं आहे. या करोनाच्या कठीण काळामध्ये आम्ही एकत्रच आम्ही या सिरीयल शूटिंग करतो आहोत. लॉकडाऊनमध्येही शूटिंग चालू होतं. खूप धैर्याने आणि शांतपणे आम्हाला सगळ्यांना आधार देत काम चालू ठेवलं. दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं, जेव्हा ही बातमी त्यांना कळाली तेव्हा आमचा एक मिश्कील असा सीन सुरू होता. बातमी ऐकून हादरून गेले, आमचे डायरेक्टर रवी करमरकर यांनी आप्पांना ताबडतोब सोलापूरला निघायला सांगितलं आप्पा म्हणाले सीन पूर्ण करतो, मग निघतो, तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून कधीही जाणार नाही, आपल्या वडिलांची अशी बातमी कळल्यानंतर हे कलाकार ते सगळं दुःख त्याच्या आतमध्ये ठेवून चेहऱ्यावर आनंदी भाव आणून एक मिश्किल सीन करतो, मनामध्ये वादळ असताना अभिनय करायचा, की आपण शांत आहोत, आनंदी आहोत, तो सीन केला त्यांनी आणि मग ते निघाले, अशी आठवण मिलिंद गवळींनी सांगितली आहे. (Aai Kuthe Kay Karte Kishor Mahabole)

इन्स्टाग्राम पोस्ट

संबंधित बातम्या :

Video | सोज्वळ आईचा हटके लूक, अरुंधती-संजनाची ऑफस्क्रीन धमाल

अभि-अनघाच्या साखरपुड्यात अंकिताचे विघ्न, ‘आई कुठे…’मध्ये नवा ट्विस्ट

(Marathi TV Serial Aai Kuthe Kay Karte Actor Kishor Mahabole lost Father completes Scene before leaving tells Marathi Actor Milind Gawali)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.