
‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतून छोटा पडदा गाजवलेली अभिनेत्री मयुरी देशमुख नेहमीच चर्चेत असते.

आता तिनं एक सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मयूरीचा पती-अभिनेता आशुतोष भाकरेच्या निधनाला जेमतेम नऊ महिने होत असताना मयुरीला दुसऱ्या लग्नाबद्दल छेडलं जातं. नुकतंच एका मुलाखतीत मयुरीने उत्तर देताना मूल दत्तक घेण्याचा विचार बोलून दाखवला. मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे? असा सवाल करत तिने आशुतोषवरील शाश्वत प्रेम अधोरेखित केलं.

सध्या मयूरीचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

मयुरी देशमुख सध्या स्टार प्लस वाहिनीवर ‘इमली’ या मालिकेत अभिनेता गश्मीर महाजनीसह मुख्य भूमिकेत दिसते आहे. तिने खुलता कळी खुलेना या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तर डिअर आजो या नाटकाचे लेखन करण्यासोबतच तिने अभिनयही केला होता.