AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो जिवंत आहे? काहीच फरक नाही… डिट्टो तसाच… पॉप किंग मायकल जॅक्सनचा थेट बसमधून प्रवास? Video घेताच…

सोशल मीडियावर मायकल जॅक्सन बसमधून प्रवास करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. अनेकांना वाटले की पॉप किंग जिवंत आहे. मात्र, हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) तयार केला होता. ब्राझीलमधील एका AI पोर्टलने बनवलेला हा व्हिडिओ मायकल जॅक्सनच्या हुबेहुब दिसणाऱ्या एका व्यक्तीचा होता.

तो जिवंत आहे? काहीच फरक नाही… डिट्टो तसाच… पॉप किंग मायकल जॅक्सनचा थेट बसमधून प्रवास? Video घेताच…
michael jackson
| Updated on: May 19, 2026 | 8:25 AM
Share

जगाला आपल्या गाण्याने आणि डान्सने वेड लावणारा पॉप किंग मायकल जॅक्सन जाऊन आज 17 वर्ष झालीत. पण मायकल जॅक्सनच्या लोकप्रियतेत तसूभरही कमी आली नाही. त्याची गाणी आजही तितक्याच उत्साहाने ऐकली जातात. आजची तरुण पिढीही मायकल जॅक्सनच्या डान्स स्टेप शिकण्यावर भर देते. इतकं मोठं गारूड मायकल जॅक्सनचं आहे. मायकल जॅक्सन गेला यावर कुणाचा विश्वासच बसत नाही. अचानक त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि सर्वांच्या काळजात धस्स झालं. आताही त्याच्या चाहत्याच्या काळजात धस्स करणारी बातमी धडकली आहे. सर्वांचा आवडता मायकल जॅक्सन काही दिवसांपूर्वी बसमधून प्रवास करताना सर्वांना दिसला. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ब्राझिलचा आहे. यात एक बुजुर्ग व्यक्ती बसमधून प्रवास करताना दिसत आहे. हा व्यक्ती हुबेहुब मायकल जॅक्सन सारखा दिसतो. त्याचे नाक, डोळे, हनुवटी सेम मायकल जॅक्सन सारखी आहे. केशरचनाही मायकल सारखीच आहे. पण वयोमानानुसार केस पांढरे झालेले आहेत. अंगात एक टीशर्ट आहे. सोबत एक काळी बॅग आहे. डोळ्याला गॉगल असून चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या दिसत आहेत. मात्र, त्याच्या हातावर म्हातारपणाचं कोणतंही लक्षण दिसत नाही. त्याचे डोळेही मायकल सारखेच आहे. बसमध्ये विंडो सीटजवळ तो शांत बसलेला दिसतो.

आणि हात तोंडावर…

जेव्हा एका व्यक्तीने त्याला पाहिले तेव्हा त्याने त्याला तो मायकल असल्याचा भास झाला. त्यानंतर या व्यक्तीने मायकल जॅक्सनचा व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. दोन तीन सेकंद या मायकल सारख्या व्यक्तीने त्याला व्हिडीओ काढू दिला. नंतर मात्र तोंडावर हात ठेवून त्याला व्हिडीओ काढण्यास मज्जाव केला. त्यामुळे हा व्यक्ती मायकल जॅक्सन तर नाही ना? अशी जोरात चर्चा सुरू झाली. हा व्हिडीओ ब्राझीलच्या Atacadão Tatuapé परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे.

खरं काय?

बसमध्ये बसलेला हा व्यक्ती मायकल जॅक्सन नाही. हा व्हिडिओ खरा नाही. हा व्हिडिओ मूळतः अशा एका अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता, ज्याच्या बायोमध्ये ते कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) पोर्टल असल्याचे नमूद केले आहे. AI-निर्मित सामग्री ओळखणाऱ्या एका साधनाने या व्हिडिओला 94.2% प्रमाणात AI द्वारे तयार केलेला असण्याची शक्यता असल्याचे दर्शवले आहे. पण लोकांनी बायोकडे न पाहता हा व्हिडीओ इतका व्हायरल केला की लोकांनाही हा मायकल जॅक्सनच असल्याचं आणि हा व्हिडीओ खरा असल्याचं वाटू लागलं. मायकलचे 25 जून 2009 रोजी निधन झाले होते. त्यामुळे हा व्हिडीओ मायकलचा नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पण एआयद्वारे तयार करण्यात आलेल्या या व्हिडीओतील व्यक्तीची चेहरेपट्टी मायकल सारखीच दाखवण्यात आल्याने अनेकांना तो मायकलच असल्याचा भास होतो.

Follow Us
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे यांचं मोठं आवाहन काय?
नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव; पूरात दिसल्या नाहीत
Nalasopara | पूरात दिसल्या नाहीत, आता श्रेय घ्यायला आल्या; नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊत
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊतांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ
एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक
Mulund Railway Station | एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक...नेमकं काय घडलं?
अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
Rohit Pawar On Jejuri Accident | अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत रोहित पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
Mumbai | ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई पोलिसांची मोठी धावपळ!
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
BJP Meeting | राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत... काय घडतंय?