नवऱ्यासोबत घटस्फोट, आता कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे मिनिषा लांबा? बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा

विशेष म्हणजे मिनिषानं 2015 साली रायन थाम याच्याशी विवाह केला होता. पण पाच वर्षानंतर दोघे वेगळे झाले. घटस्फोट घेतला. रायन यांचं रेस्टॉरंट होतं.

नवऱ्यासोबत घटस्फोट, आता कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे मिनिषा लांबा? बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा
Minisha lamba in relationship now
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 05, 2021 | 9:56 PM

तुम्हाला मिनिषा लांबा आठवतेय? होय, जी बिग बॉसमध्ये होती, जिच्या ‘यहाँ’ सिनेमानं वाहवा मिळवली होती. आता मिनिषा लांबा फार कुठल्या सिनेमात किंवा इतर टीव्ही शोजमध्ये दिसत नसली तरीसुद्धा गेल्या काही काळात ती दोन कारणांमुळे चर्चेत आहे. पहिलं कारण- नवऱ्यासोबत घेतलेला घटस्फोट आणि दुसरं कारण पुन्हा नव्या बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिप. अर्थातच मिनिषानं थेट नाव न घेता तीनं रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबूल केलंय पण बॉयफ्रेंडचं नाव घ्यायला अजूनही ती तयार नाही. असं असलं तरी इश्क लपून थोडंच राहतं. आग लागली तर धूर दिसणारचं. म्हणूनच दिल्लीच्या एका बिजनसमॅनसोबत मिनिषा लांबा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. (Actress Minisha Lamba in relationship with businessman) कोण आहे मिनिषाचा नवा बॉयफ्रेंड? मिनिषाच्या नव्या बॉयफ्रेंडचं नाव आकाश मलिक (Aakash Malik) असल्याची चर्चा आहे. आकाश हा बिजनसमन असून कमोडेटी ट्रेंडिंग कंपनी तो चालवतो. दोघांची भेट दोन वर्षापुर्वी म्हणजे 2019 मध्ये झाल्याचं समजतं. दोघांची भेट ही पोकर गेम खेळताना झाली आणि नंतर मग ओळख रिलेशनशिपपर्यंत पोहोचली. पण असं असलं तरी मिनिषा अजूनही आकाश मलिकचं नाव उघड उघड घ्यायला तयार नाही. एका प्रश्नाच्या उत्तरात ती म्हणाली-मी माझं नातं आणि बॉयफ्रेंडमधली माहिती खासगी ठेऊ इच्छिते. म्हणजे मी अशा रिलेशनशिपमध्ये आहे हे कबूल करते पण मी पार्टनरचं नाव जगजाहीर नाही करु शकत. कारण त्याचा मनोरंजन जगाशी काही संबंध नाही. त्यांचं कुटुंब आहे त्याचाही मला विचार करावा लागेल.

मिनिषाच्या फिल्म आणि घटस्फोट मिनिषाची पहिली फिल्म 2005 मध्ये आली होती. ती होती सुजित सरकार यांची यहाँ (Yahaan). त्यात तिनं एका काश्मीरी मुलीची भूमिका केली होती. त्यातल्या गाण्यांमुळे फिल्म चर्चेत होती. नंतर तिला आपण बचना ऐ हसिनो (Bachna Ae Haseeno), हनीमुन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड (Honeymoon travels pvt ltd) अशा काही फिल्मध्ये पाहिलं. टीव्हीवरही मिनिषा दिसली होती. बिग बॉसच्या आठव्या (Big Boss – 8) सिजनमध्ये ती होती. विशेष म्हणजे मिनिषानं 2015 साली रायन थाम याच्याशी विवाह केला होता. पण पाच वर्षानंतर दोघे वेगळे झाले. घटस्फोट घेतला. रायन यांचं रेस्टॉरंट होतं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें