AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समंथाच्या घटस्फोटाबाबत वादग्रस्त टिप्पणी, अखेर मंत्र्याचा माफीनामा; नाग चैतन्यसह नागार्जुनही भडकलेले

समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी अखेर मंत्री कोंडा सुरेखा यांनी जाहीर माफी मागितली आहे. वर्षभरानंतर त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित नागार्जुन यांची माफी मागितली आहे.

समंथाच्या घटस्फोटाबाबत वादग्रस्त टिप्पणी, अखेर मंत्र्याचा माफीनामा; नाग चैतन्यसह नागार्जुनही भडकलेले
नागार्जुन, समंथा आणि नाग चैतन्यImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 12, 2025 | 11:32 AM
Share

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि तिचा पूर्व पती नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तेलंगणामधील काँग्रेसच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी अखेर जाहीर माफी मागितली आहे. जवळपास वर्षभरानंतर त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांची माफी मागितली आहे. नागार्जुन यांनी कोंडा सुरेखा यांच्या वक्तव्याविरुद्ध आधीच मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे. त्यादरम्यान मंगळवारी मध्यरात्री त्यांनी ट्विट करत जाहीर माफी मागितली आहे. ‘नागार्जुन यांच्या कुटुंबाविरुद्ध केलेल्या वादग्रस्त टिपण्ण्यांबद्दल मला पश्चात्ताप आहे’, असं त्यांनी त्यात म्हटलंय. नागार्जुन यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर कोंडा सुरेखा यांनी दिलेला माफीनामा सध्या चर्चेत आला आहे.

कोंडा सुरेखा यांचा माफीनामा

कोंडा सुरेखा यांनी मध्यरात्री 12 नंतर त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर हा माफीनामा पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केलं की नागार्जुन आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. जर माझ्या टिप्पण्यांमुळे भावना दुखावल्या असतील तर, तर मी माफी मागते आणि त्याबद्दल खेद व्यक्त करते. मी माझं वक्तव्य मागे घेते, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय.

नेमकं काय म्हणाल्या होत्या कोंडा सुरेखा?

बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटीआर यांच्यावर टीका करताना मंत्री कोंडा सुरेखा यांनी नाग चैतन्य आणि समंथा यांच्या घटस्फोटाचा उल्लेख खोचकरित्या केला होता. “केटीआर यांच्यामुळेच 100 टक्के नाग चैतन्यचा घटस्फोट झाला आहे. कारण एन. कन्वेन्शन हॉलवर हातोडा पडू नये म्हणून तुम्हाला समंथाला माझ्याकडे पाठवावं लागलं होतं. नागार्जुन यांनी समंथाला केटीआर यांच्याकडे जाण्यास भाग पाडलं होतं आणि ते म्हणाले, एकतर तू (समंथा) आमचं म्हणणं ऐक किंवा घटस्फोट दे. त्यामुळेच हा घटस्फोट झाला. संपूर्ण इंडस्ट्रीला याबद्दल माहीत आहे”, असं कोंडा सुरेखा यांनी म्हटलं होतं. सुरेखा यांच्या या वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात होताच त्यांनी समंथाची जाहीर माफी मागितली होती.

नाग चैतन्यची संतप्त प्रतिक्रिया

कोंडा सुरेखा यांच्या टिप्पणीनंतर नाग चैतन्यने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट लिहिली होती. ‘घटस्फोटाचा निर्णय हा आयुष्यातील सर्वांत वेदनादायक आणि दुर्दैवी निर्णयांपैकी एक आहे. बराच विचार केल्यानंतर मी आणि माझ्या पूर्व जोडीदाराने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याबाबत आता अत्यंत निराधार आणि हास्यास्पद गॉसिप होत आहेत. माझ्या पूर्व जोडीदाराबद्दल आणि माझ्या कुटुंबीयांबद्दल असलेल्या आदरापोटी मी आतापर्यंत मौन बाळगलं होतं. मंत्री कोंडा सुरेखा यांनी केलेला दावा फक्त खोटाच नाही तर निव्वळ हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे. केवळ प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांचा गैरफायदा घेणं आणि शोषण करणं हे लज्जास्पद आहे,’ असं नाग चैतन्यने म्हटलं होतं.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु