KBC 17: अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला 25 लाखांसाठी विचारला खूपच इंट्रेस्टींग प्रश्न; तुम्ही उत्तर देऊ शकाल का?
केबीसी 17 मध्ये, मिथिलेश नावाच्या स्पर्धकाला 25 लाखांसाठी फारच इंट्रेस्टींग प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर त्याने दिलही आहे. पण तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल का?

अमिताभ बच्चन यांचा कोन बनेगा करोडपती सीझन 17 लोकांना खूप आवडत आहे. या सीझनमध्ये उत्तराखंडचा आदित्य नावाचा करोडपती बनला आहे. त्याने 1 कोटी रुपये जिंकले आहेत. यानंतर, आता बिहारचा स्पर्धक मिथिलेश कुमार केबीसीच्या हॉट सीटवर आहे.
मिथिलेशने या हंगामात सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन 25 लाख रुपये जिंकले आहेत. मिथिलेशने तर 25 लाखांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. पण त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही माहित आहे? कारण हा प्रश्न तसा सोपा असल्याचं अनेक माहितीदारांचं म्हणणं आहे. जो व्यक्तीचे सामान्यज्ञान चांगले आहे त्याला या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देऊ शकेल. तुम्हीही एकदा उत्तराचा अंदाज लावून पाहा.
अमिताभ बच्चन यांचा 25 लाख रुपयांचा प्रश्न काय होता?
शेवटच्या भागात, अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती सीझन 17 मध्ये हॉट सीटवर बसलेल्या मिथिलेशला एक प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर देण्यात तो यशस्वी झाला आहे. बिग बींनी हॉट सीटवर बसलेल्या बिहारच्या मिथिलेशला प्रश्न विचारला होता, ‘कोणता असा पहिला देश, जिथे नागरिकांना ब्रॉडबँड इंटरनेटचा कायदेशीर अधिकार देण्यात आला होता? त्यासाठी पर्याय होते अ) फिनलंड, ब) कॅनडा, क) न्यूझीलंड, ड) जर्मनी.
‘ऑडियंस पोल’चा वापर केला.
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, मिथिलेशने प्रेक्षकांच्या मतदानाचा म्हणजे ‘ऑडियंस पोल’चा वापर केला. ज्याद्वारे त्याला योग्य ते उत्तर मिळालं आणि को लाखो रुपये जिंकला. तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर माहित आहे का? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहित असेल तर अनेकांना नसेलही. तर, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फिनलंड. 2010 मध्ये, फिनलंड हा पहिला देश होता ज्याने आपल्या नागरिकांना ब्रॉडबँड इंटरनेटचा कायदेशीर अधिकार दिला.
View this post on Instagram
मिथिलेशच्या खांद्यावर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी
सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मिथिलेश बिग बींना त्याची कहाणी सांगताना दिसत आहे त्याच्या वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. तो लहानपणापासूनच त्यांच्या भावाची काळजी घेत आहे. त्यांच्या भावाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जायचे आहे आणि त्यांनी सायकलही त्याच्याकडे मागितली आहे. परंतु पैशाअभावी तो त्यांची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत नाही. असं दु:ख त्याने अमिताभ यांच्यासमोर व्यक्त केलं आहे.
