‘मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो..’ अमेय खोपकरांचा ‘बिग बॉस’ स्पर्धकाला इशारा!

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जानच्या या वक्तव्यानंतर त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

‘मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो..’ अमेय खोपकरांचा ‘बिग बॉस’ स्पर्धकाला इशारा!

मुंबई : सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू (Jaan Sanu) आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी (Ameya khopkar) जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. (MNS leader Ameya Khopkar Warns Bigg Boss contestant Jaan kumar sanu over his statement on Marathi language)

खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले आहे. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला, ‘माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल’, असे म्हंटले. तसेच, मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला.

मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो..

जान कुमार सानूचे हे वक्तव्य सध्या प्रचंड व्हायरल झाले आहे. या वक्तव्यामुळे समस्त मराठी प्रेक्षकांची मने दुखावली गेली आहेत. सगळ्याच मराठी प्रेक्षकांनी जान कुमार सानूवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मनसेनेही यावरून जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जानच्या या वक्तव्यानंतर त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. (MNS leader Ameya Khopkar Warns Bigg Boss contestant Jaan kumar sanu over his statement on Marathi language)

‘जान कुमार सानू…मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी…मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला. मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,’ असे ट्विट करत अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला इशारा दिला आहे.

(MNS leader Ameya Khopkar Warns Bigg Boss contestant Jaan kumar sanu over his statement on Marathi language)

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *