AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बार्बी डॉल’ सारखं दिसण्याचा हट्ट महागात, मॉडेलनं खर्च केले कोट्यावधी, पण फुगलेल्या ओठांमुळे चेहरा बिघडला

बार्बी प्रमाणे दिसण्याच्या हट्टापायी एका मॉडेलनं हद्द पार केली आहे. या मॉडेलने तिच्या चेहऱ्यावर वारंवार बोटॉक्स केल्याने ओठ अन् चेहरा बिघडला आहे. तिचे ओठ पाहून नेटकरीही घाबरलेत.

'बार्बी डॉल' सारखं दिसण्याचा हट्ट महागात, मॉडेलनं खर्च केले कोट्यावधी, पण फुगलेल्या ओठांमुळे चेहरा बिघडला
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jan 04, 2025 | 5:15 PM
Share

सौंदर्याची व्याख्या प्रत्येकासाठी नक्कीच वेगळी असते. त्यासाठी आजकाल कोण कोणत्या थराला जाईल असं काही सांगता येत नाही. अनेक अभिनेत्री किंवा मॉडेल्स यासाठी बोटॉक्स करतात, सर्जरी करतात. त्यावर लाखो, करोडो रुपये खर्च करतात. पण प्रत्येकावर ही ट्रिटमेंट वर्क करतेच असं नाही. तर काही जणींचा चेहरा हा खराब होतो.

बॉर्बीसारखं दिसण्याचा हट्ट महागात

असंच काहीसं ऑस्ट्रेलियातील 30 वर्षीय मॉडेलसोबत झालं आहे. ‘फेटिश बार्बी’या नावाने ही मॉडेल प्रसिद्ध आहे. तिने स्वत:ला बार्बी डॉलसारखे करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.

वयाच्या 18 व्या वर्षी तिने कॉस्मेटिक ट्रीटमेंट्सची सुरुवात केली आणि तेव्हापासून आतापर्यंत बोटोक्स आणि फिलर्सद्वारे स्वत:च्या लुकला तिने पूर्णपणे बदलून टाकले आहे. आता तिच्या ओठांचा आकार बदलला आहे.

बॉर्बीप्रमाणे दिसण्यासाठी लाखो-करोडो खर्च 

‘फेटिश बार्बी’ने बॉर्बीप्रमाणे दिसण्यासाठी बोटॉक्स आणि फिलर्स ट्रिटमेंटवर कोट्यवधी खर्च केले. बोटॉक्स आणि फिलर्स करुन या मॉडेलने तिच्या ओठांचा आकार फार वाढवला आहे, ते दिसायलाही फार विचित्र दिसत आहे. याशिवाय तिने ब्रेस्ट इंप्लांटही केले आहे. लीप फिलर्स आणि ब्रेस्ट इंप्लांट यामुळे तिच्या शरीराचा आकार बदलला असून ती विचित्र दिसत आहे.

‘फेटिश बार्बी’ म्हणून प्रसिद्ध असलेली मॉडेल एक सोशल मीडिया पर्सनॅलिटी आहे. ती बोल्ड फोटोशूट आणि व्हिडीओ शेअर करत कायम चर्चेत राहते.

बोटॉक्स आणि फिलर्स करुन ती तिचा चेहरा खराब करेल, असं तिच्या मित्रांना वाटतं. पण, तिला त्याची पर्वा नसल्याचं ती म्हणते तसेच तिला तिचं हे रुप आवडत असल्याचंही तिने म्हटलं आहे.

दर 3 ते 4 महिन्यांनी लिप फिलर्स करून घेते

ती दर 3 ते 4 महिन्यांनी लिप फिलर्स करून घेते, ज्यामुळे तिचे ओठ अधिक मोठे दिसतात. आतापर्यंत बोटॉक्स ट्रिटमेंटवर तिने 32 लाख ते 53 लाख रुपये खर्च केले आहेत. पुढेही तो खर्च वाढताना दिसत आहे. तिला बोटॉक्सचे व्यसन लागले आहे, असंही ती सांगते. वयाच्या 18 व्या वर्षापासून ती लिप फिलर वापरतेय. एकीकडे तिचे मित्र तिच्यासाठी चिंतेत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगला सामोर जावं लागतं आहे. तसेच तिच्या या ओठांमुळे अनेकांनी ते भितीदायक वाटत असल्याचंही म्हटलं आहे.

तज्ञांचा इशारा

दरम्यान बोटोक्स आणि फिलर्सचा अत्याधिक वापर आरोग्यावर गंभीर प्रभाव पाडू शकतो असं तज्ञांनी म्हटलं आहे. या शस्त्रक्रियेमुळे शारीरिक समस्यांसोबत मानसिक तणावही होऊ शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. ‘फेटिश बार्बी’चा अनोखा लुक आणि तिचे बार्बी डॉलसारखे दिसण्याचा ध्यास सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Follow Us
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?