AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीला अचानक फोन आला अन् बदललं संपूर्ण आयुष्य, पण लग्नानंतर…

महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय फेम 'मोहब्बतें' सिनेमा आजही कोणी विसरु शकत नाही. सिनेमातील गाणी फक्त गांणी नाही तर, चाहत्यांसाठी भावना आहेत. सिनेमातील अभिनेत्री प्रिती झंगियानी हिच्याबद्दल फार कोणाला माहिती नाही... तर जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल

'मोहब्बतें' फेम अभिनेत्रीला अचानक फोन आला अन् बदललं संपूर्ण आयुष्य, पण लग्नानंतर...
Mohabbatein
| Updated on: Aug 18, 2026 | 9:04 AM
Share

बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकाराची एन्ट्री मोठ्या आणि पूर्ण प्लानिंगने होते. पण अभिनेत्री प्रिती झंगियानी हिची बॉलिवूडमधील एन्ट्री फार वेगळी आहे. प्रितीने कधीच अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं आणि ‘मोहब्बतें’ सिनेमात काम करण्याची संधी मिळेल, अशी कल्पना देखील केली नव्हती. पण मॉडेलिंगने करियरची सुरुवात करणाऱ्या प्रितीला अचानक यश राज फिल्म्समधून एक फोन आला आणि प्रिती हिला महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय फेम ‘मोहब्बतें’ यांच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमातून प्रिती एका रात्रीत लोकप्रिय झाली.

अभिनेत्री प्रिती झंगियानी हिचा जन्म 18 ऑगस्ट 1980 मध्ये एका सिंधी कुटुंबात झाला. सिनेमात येण्यापूर्वी ती मॉडलिंग करायची. 1997 मध्ये तिला राजश्री प्रॉडक्शनच्या ‘ये है प्रेम’ या म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. या म्युझिक व्हिडिओमुळे तिला ओळख मिळाली आणि त्यानंतर ती अनेक जाहिरातींमध्ये झळकली.

प्रीतीने फिल्मी करियरची सुरुवात बॉलीवूडमधून नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून केली; 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मझाविल्लू’ या मल्याळम सिनेमात दिसली. त्यानंतर तिने ‘थम्मूडू’ या तेलगू सिनेमात काम केलं. अशात हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला. ‘मोहब्बतें’ सिनेमा आणि सिनेमातील प्रितीचा किस्सा फार वेगळा आहे.

Preeti Jhangiani

प्रितीने एका मुलाखतीत सांगितलं, तिला अचानक यश राज फिल्म्सच्या ऑफिसमधून फोन आला. तिला निर्माते आदित्य चोप्रा यांनी बोलावलं होतं. सर्वात खास गोष्ट म्हणजे, प्रिती हिला सिनेमासाठी कोणतं ऑडिशन देखील द्यावं लागलं नाही. एका भेटीनंतर प्रिती हिला ‘मोहब्बतें’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर अनेक सिनेमात प्रितीने काम केलं. पण तिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही.

बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रिती हिने लग्न केलं. अभिनेत्रीने परवीन डबास (Parvin Dabas) याच्यासोबत 2008 मध्ये लग्न केलं. त्यानंतर प्रिती हिने अभिनयाला निरोप दिला आणि संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला. त्यानंतर 2017 मध्ये प्रिती राजस्थानी ‘तावड़ो: द सनलाइट’ सिनेमात दिसली. सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. त्यानंतर तिने ओटीटी प्लॅटफॉर्म देखील पदार्पण केलं.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत