यंदा मराठी चित्रपटांची खास मेजवाणी; दहा पेक्षाही अधिक चित्रपट होणार रिलीज!

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मार्चमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. ज्यामुळे अनेक चित्रपटांची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

यंदा मराठी चित्रपटांची खास मेजवाणी; दहा पेक्षाही अधिक चित्रपट होणार रिलीज!

मुंबई : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मार्चमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. ज्यामुळे अनेक चित्रपटांची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आल्या होत्या. बिग बजेटच्या चित्रपटांना यामुळे फटका बसला होता. आता चित्रपटगृहे पुर्ण क्षमतेसह उघडली आहेत. त्यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांनी त्यांची चित्रपटे रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे. फेब्रुवारी आणि एप्रिल दरम्यान दहापेक्षा अधिक मराठी चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. (More than 10 Marathi films will be released)

2020 मध्ये म्हणावे तसे चित्रपट रिलीज करता आले नसल्यामुळे मराठीतील अनेक चित्रपटे रिलीजची वाट पाहात आहेत. यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट डार्लिंग रिलीज होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढच्या आठवड्यात ईमेल फिमेल, बेफाम हे दोन मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत.  मार्चमध्ये हॅशटॅग प्रेम आणि झाॅलिवूड हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.एप्रिलमध्ये फ्रि हिट दणका, गोदावरी आणि झोंबिवली असे बहुप्रतिक्षीत चित्रपट रिलीज होणार आहे.

म्हणजे 2021 हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी एकदम चांगले जाणार आहे. प्रत्येक महिन्यात साधारण दोन ते तीन मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत. नवीन वर्षाची दमदार सुरूवात करण्याच्या उद्देशानं ‘डार्लिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लॉकडाऊनमुळे या वर्षात आलेली मरगळ झटकून नव्या वर्षात नव्या उमेदीनं भरारी घेण्याचं टॉनिक ही मराठमोळी ‘डार्लिंग’ सर्वांना देईल अशी खात्री सिनेमाच्या निर्मात्यांना वाटते.

‘डार्लिंग’चं लेखन समीर आशा पाटील यांनी केलं असून या सिनेमात प्रथमेश परब, रितीका श्रोत्री, निखिल चव्हाण, मंगेश कदम, आनंद इंगळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चिनार-महेश या आजच्या काळातील आघाडीच्या संगीतकार जोडीनं चित्रपटातील गीते संगीतबद्ध केली आहेत. सध्या जाहिरातींमधूनही कधी नवनवीन मराठी चेहरे आता दिसू लागले आहेत. अशाच वेगवेगळ्या जाहिरातींमधून घराघरांत पोहोचलेले दोन मराठी चेहेरे आता ‘इमेल फिमेल’ या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

अभिनेता निखिल रत्नपारखी आणि कांचन पगारे ही जाहिरात क्षेत्रातील दोन परिचित नावं आता ‘इमेल फिमेल’ चित्रपटात आपली कमाल दाखवत धमाल घडवणार आहेत. या दोघांचा जाहिरातीतला ‘शॉर्ट अँड स्वीट’ असा अंदाज या चित्रपटातून दिसणार आहे. 26 फेब्रुवारीला ‘इमेल फिमेल’ प्रदर्शित होणार आहे. एस.एम.बालाजी प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.
अपयश ही यशाची पहिली पायरी असते.

त्यामुळे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी अपयशाच्या बऱ्याच पायऱ्या ओलांडाव्या लागतात. मात्र अशावेळी खचून न जाता पुन्हा उठून यशाकडचा प्रवास नव्याने सुरू करणारा प्रत्येक व्यक्ती यशाच्या दारात पोहोचतोच. या साऱ्या प्रवासात मात्र तो प्रत्येक पायरीवर एक नवी शिकवण शिकत पुढे जात असतो. यशाचे आणि अपयशाचे उत्तम समीकरण साधणारा नवाकोरा ‘बेफाम’ हा चित्रपट ‘अमोल कागणे प्रोडक्शन’द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

संबंधित बातम्या : 

Video : माग पळून पळून वाट माझी लागली, अन्… शालूचा हॉट अंदाज; सोशल मीडियावर धुमाकूळ

Marathi Movie : अखेर ‘हरिओम’वरील पडदा उठला, हरिओम घाडगे, गौरव कदम साकारणार प्रमुख भूमिका

Marathi Movie : शिवजयंतीच्या मुहूर्तावर उलगडलं ‘त्या’ व्यक्तिरेखेचं गुढ,‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात गश्मिर महाजनी झळकणार मुख्य भूमिकेत

(More than 10 Marathi films will be released)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI