Most streamed Hindi films: ‘या’ टॉप 10 चित्रपटांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती; यादीत चकीत करणारी नावं

एखादा व्यक्ती जेव्हा चित्रपटाची किंवा वेब सीरिजची 30 मिनिटं पूर्ण करतो, तेव्हा एक व्ह्यू यानुसार त्यांनी ही यादी तयार केली आहे. चित्रपटांच्या बाबतीत या यादीत अनपेक्षित नावं पहायला मिळतात.

Most streamed Hindi films: 'या' टॉप 10 चित्रपटांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती; यादीत चकीत करणारी नावं
प्रेक्षकांकडून सर्वाधिक पाहिले गेलेले टॉप 10 हिंदी चित्रपट
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 21, 2022 | 10:39 AM

ओरमॅक्स मीडिया (Ormax Media) या रिसर्च फर्मने नुकतीच हिंदी भाषेतील सर्वाधिक स्ट्रीम झालेल्या चित्रपटांची (Most streamed Hindi films) आणि वेब सीरिजची यादी जाहीर केली. एखादा व्यक्ती जेव्हा चित्रपटाची किंवा वेब सीरिजची 30 मिनिटं पूर्ण करतो, तेव्हा एक व्ह्यू यानुसार त्यांनी ही यादी तयार केली आहे. चित्रपटांच्या बाबतीत या यादीत अनपेक्षित नावं पहायला मिळतात. RRR, गंगुबाई काठियावाडी यांसारखे चित्रपट, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली, त्यांचा टॉप 10 मध्येही समावेश नाही. किंबहुना यामी गौतमच्या ‘अ थर्स्ट डे’ या चित्रपटाने या यादीत बाजी मारली आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवरील या चित्रपटाला तब्बल 25.5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.

2022 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक पाहिले गेलेले हिंदी चित्रपट

अ थर्स्ट डे (डिस्ने+ हॉटस्टार)- 25.5 दशलक्ष
गेहराईयाँ (प्राइम व्हिडिओ)- 22.3 दशलक्ष
कौन प्रवीण तांबे? (डिस्ने+ हॉटस्टार)- 20.2 दशलक्ष
जलसा (प्राइम व्हिडिओ)- 13.9 दशलक्ष
शर्माजी नमकीन (प्राइम व्हिडिओ)- 12.7 दशलक्ष
दसवी (नेटफ्लिक्स)- 10.4 दशलक्ष
फॉरेन्सिक (ZEE5)- 8.6 दशलक्ष
थार (नेटफ्लिक्स)- 7.8 दशलक्ष
लव्ह हॉस्टेल (ZEE5)- 7.5 दशलक्ष
लूप लपेटा (नेटफ्लिक्स)- 5.7 दशलक्ष

सर्वाधिक पाहिलेल्या हिंदी वेब सीरीज

पंचायत सिझन 2 (ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ)
रॉकेट बॉईज (SonyLIV)
गुल्लक सिझन 3 (SonyLIV)
रुद्र (डिस्ने+ हॉटस्टार)
मानव (डिस्ने+ हॉटस्टार)
द ग्रेट इंडियन मर्डर्स (डिस्ने+ हॉटस्टार)
माई (नेटफ्लिक्स)
भौकाल (एमएक्स प्लेयर)
अफरन सिझन 2 (ALTBalaji)
आश्रम सिझन 3 (MX प्लेयर)

2022 मधील बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपट

पठाण
राम सेतू
विक्रम वेधा
आदिपुरुष
जवान

परंतु या यादीबाबत बरेच प्रेक्षक समाधानी नाहीत. अनेकांनी सलमान खानचा आगामी चित्रपट ‘टायगर 3’ बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीत का नाही असा प्रश्न उपस्थित केला. तर काहींनी रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ आणि आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’देखील या यादीत हवा होता, असं म्हटलं. IMDb ने 2022 मधील टॉप 10 भारतीय चित्रपटांची यादी जाहीर केल्याच्या एका आठवड्यानंतर ओरमॅक्सची ही यादी समोर आली आहे. IMDb ने जाहीर केलेल्या यादीत विक्रम, केजीएफ 2, द काश्मीर फाईल्स, हृदयम आणि RRR या चित्रपटांना 8 पेक्षा जास्त रेटिंग मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें