AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मौनी रॉय – सूरज नांबियार यांच्यात नेमकं कुठे बिनसलं? बिग बींच्या चित्रपटासारखंच घडलं सर्वकाही?

अभिनेत्री मौनी रॉयच्या घटस्फोटाबाबत विक्की लालवानीने मोठा खुलासा केला आहे. मौनी आणि सूरज यांच्यात नेमकं काय बिनसलं, यामागचं कारण त्याने सांगितलं आहे. मौनी आणि सूरज गेल्या सहा महिन्यांपासून वेगवेगळे राहत आहेत.

मौनी रॉय - सूरज नांबियार यांच्यात नेमकं कुठे बिनसलं? बिग बींच्या चित्रपटासारखंच घडलं सर्वकाही?
मौनी रॉय, सूरज नांबियारImage Credit source: Instagram
| Updated on: May 14, 2026 | 12:03 PM
Share

प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मौनी आणि सूरज नांबियार यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चांनी गेल्या दोन दिवसांपासून जोर धरला आहे. यामागचं कारण म्हणजे दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं असून एकमेकांसोबतचे फोटोसुद्धा डिलिट केले आहेत. सूरजने मौनीची फसवणूक केल्याचं म्हटलं जात असतानाच मौनीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित प्रायव्हसी देण्याची विनंती केली. यादरम्यान विक्की लालवानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर मौनी रॉयच्या लग्नाबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने दावा केला की मौनी आणि सूरज यांचं नातं सहा महिन्यांपूर्वीच संपुष्टात आलं आहे. परंतु दोघांनी अद्याप घटस्फोटासाठी अर्ज केला नाही. हे दोघं घटस्फोटाआधी काऊन्सलिंग सेशनमध्ये भाग घेण्याचा विचार करत असल्याचा दावाही विक्कीने केला आहे.

विक्की लालवानीने म्हटलंय, “मौनी रॉयचा दुबई स्थित बिझनेसमन सूरज नांबियारशी असलेला लाँग डिस्टन्स संसार संपुष्टात आला आहे. या दोघांच्या हृदयातील एकमेकांविषयी असलेलं प्रेम कमी झालं असून भांडणं वाढली आहेत. आता फक्त चमत्कारच या दोघांना एकत्र आणू शकतो. गेल्या सहा महिन्यांपासून मौनी आणि सूरज एकमेकांसोबत राहत नाहीयेत. मागे वळून पाहिलं तर ऑक्टोबर 2025 पासून मौनी एकटीच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसतेय. आता ती दुसरीकडे राहायला जाणार असल्याचंही कळतंय.”

“मीडियाच्या नजरेतून आपला घटस्फोट लपवण्यासाठी मौनी रॉयने जी कल्पना अंमलात आणली, त्यासाठी तिचं थोडं कौतुक करावंच लागेल. परंतु ती आता काही वकिलांसोबतही चर्चा करत असल्याचं कळतंय. या चर्चेनंतर दोघं काऊन्सिंग सेशन सुरू करू शकतात. अद्याप दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला नाही. सूरजने मौनीची फसवणूक केली नाही. परंतु असं ऐकू येतंय की, 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘अभिमान’ या चित्रपटात जसं अमिताभ बच्चन यांना जया भादुरी यांच्याबद्दल वाटत होतं, तसंच काहीसं इथेही घडलंय. सूरजकडे खूप पैसा असला तरी, जेव्हा कधी तो मुंबईत येतो, तेव्हा त्याची पत्नी मौनीची प्रत्येक ठिकाणी खूप ओळख आणि प्रसिद्धी असल्याचं पाहतो. त्याला कोणीच ओळखत नाही, याचा न्यूनगंड आहे”, असंही विक्कीने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

विक्कीच्या या पोस्टमुळे आता नवीन चर्चांना उधाण आलं आहे. मौनीच्या स्टारडममुळे सूरजसोबतच्या नात्यात फूट पडली का, असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.

Follow Us
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण