AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा पटानीमुळे मौनीच्या संसारात मिठाचा खडा? वैतागून पती सूरजने उचललं हे पाऊल

प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे चर्चेत आली आहे. पती सूरज नांबियार आणि तिने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दिशा पटानीमुळे मौनीच्या संसारात मिठाचा खडा? वैतागून पती सूरजने उचललं हे पाऊल
मौनी रॉय आणि सूरज नांबियारImage Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2026 | 9:32 AM
Share

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मौनी रॉयने पती सूरज नांबियारशी घटस्फोट घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यामागचं कारण म्हणजे या दोघांनीही एकमेकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून अनफॉलो केलं आहे. इतकंच नव्हे तर मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटोसुद्धा काढून टाकले आहेत. सूरजसोबतचे इतरही फोटो तिच्या अकाऊंटवर सध्या दिसत नाहीयेत. मंगळवारपासून या चर्चांनी जोर धरताच अखेर सूरजने त्याचं सोशल मीडिया अकाऊंट डिएक्टीव्हेट केलं आहे.

दिशा पटानीमुळे मौनी-सूरजच्या नात्यात पडली फूट?

मिळालेल्या माहितीनुसार, मौनी रॉय आणि सूरज नांबियार हे शेवटचे जानेवारी महिन्यात एकत्र दिसले होते. हे दोघं उदयपूरमध्ये अभिनेत्री क्रिती सनॉनची बहीण नुपूर सेनॉन आणि गायक स्टेबिन बेनच्या लग्नसोहळ्याला पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत मौनीची जिवलग मैत्रीण आणि अभिनेत्री दिशा पटानीसुद्धा उपस्थित होती. एअरपोर्टवर या तिघांना पापाराझींनी एकत्र पाहिलं होतं. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओकडे आता नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. कारण यामध्ये मौनी आणि सूरज एकमेकांसोबत फोटो काढण्यास नकार देताना दिसत आहेत. तर सूरज दिशासोबत गप्पा मारत पुढे चालत जाताना पहायला मिळतोय. यावेळी पापाराझी मौनीला घेरतात आणि त्यामुळे ती चिडते.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

सुरुवातीला मौनी पापाराझींना सांगते की दिशाचे फोटो घ्या. तरीसुद्धा फोटोग्राफर्स तिचाच पाठलाग करतात. यामुळे ती अधिक नाराज होते. या व्हिडीओमध्ये ती सतत पापाराझींसमोर हात जोडून त्यांना प्रायव्हसी देण्याची विनंती करते. आता मौनी आणि सूरजच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. जानेवारीपासूनच त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. घटस्फोटाच्या या वृत्तांवर अद्याप मौनी किंवा सूरजने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. यादरम्यान दिशा पटानीनेही सूरजला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जातोय की, सूरजने मौनीची फसवणूक केली. मौनीच्या इन्स्टाग्रामवर सूरजसोबतचे काही फोटो अजूनही पहायला मिळत आहेत. परंतु या चर्चांदरम्यान सूरजने मात्र त्याचा अकाऊंट बंद केला आहे.

मौनीने 2022 मध्ये सूरज नांबियारशी लग्न केलं. सूरज हा प्रसिद्ध बँकर आहे. तसंच त्याचा बिझनेससुद्धा आहे. 2019 मध्ये सूरज आणि मौनी यांची दुबईत एका पार्टीदरम्यान भेट झाली होती. या भेटीदरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली आणि नंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं.

Follow Us
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर...
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर....
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा.
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय...
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय....
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!.
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची...
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची....
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड.
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?.
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या..
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?.