Ms Dhoni | सिनेमांमध्ये काम करणार एमएस धोनी? पत्नी साक्षी हिच्याकडून मोठा खुलासा
साक्षीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर एमएस धोनी अभिनय देखील करणार? क्रिकेटपटूच्या पत्नीने अखेर सत्य सांगितलं.... सध्या सर्वत्र साक्षी धोनी हिच्या वक्तव्याची चर्चा...

मुंबई | 26 जुलै 2023 : भारतीय क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध आणि दमदार खेडाळू म्हणजे एमएस धोनी. सामना सुरु असताना धोनी मैदानात उतरल्यानंतर चाहते टाळ्याचा कडकडात करतात. आजही मैदानावरील धोनीची कामगिरी चाहत्यांच्या लक्षात आहे. धोनी कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. धोनी आणि पत्नी साक्षी यांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. साक्षी आणि धोनी यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. क्रिकेटपटूच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं साक्षीने नुकताच सिनेमा निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. साक्षी हिने ‘लेट्स गेट मॅरिड’ या तामिळ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. धोनी एंटरटेनमेन्ट बॅनर अंतर्गत साक्षीने पहिल्या सिनेमाची निर्मिती केली आहे.
‘लेट्स गेट मॅरिड’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक रमेश थमिलमानी यांच्यावर असून सिनेमात नादिया, हरीश कल्याण, इवाना, आरजे विजय आणि योगी बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच सिनेमाच्या प्रमोशनसाठी साक्षी पोहोचली होती. तेव्हा साक्षी हिच्यासोबत पती आणि क्रिकेटर धोनी देखील होता.
प्रमोशन दरम्यान साक्षीला विचारण्यात आलं की, ‘धोनी कोणत्या सिनेमात भूमिका साकारू शकतो…’ यावर साक्षीने मोठा खुलासा केला आहे. साक्षी म्हणाली, ‘चांगली स्क्रिप्ट असले तर नक्की… धोनी कॅमेऱ्यासमोर यायला लाजत नाही. २००६ पासून तो जाहिरातींमध्ये अभिनय करत आहे. धोनीला ऍक्शन सिनेमांमध्ये काम करायला आवडेल…’
पुढे साक्षी म्हणाली, ‘आम्ही तामिळ सिनेमाची निर्मिती केली आहे. कारण राज्यासोबत आमचं एक अतुट नातं आहे. शिवाय कमी बजेटच्या सिनेमांसोबत काम करणं यामागे देखील वेगळं कारण आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात लहान गोष्टीपासून झाली पाहिजे. सिनेमाची कथा सासू – सुनेच्या नात्याभोवती फिरत आहे…’ असं देखील साक्षी म्हणाली.
धोनी आणि साक्षी यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमानंतर दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा तुफान रंगली. सिनेमाच्या माध्यमातून धोनीने केलेला संघर्ष आणि त्याचं खासगी आयुष्य चाहत्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. आज धोनी पत्नी साक्षी हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नात्याच्या चर्चा रंगल्यानंतर धोनीने ०४ जुलै २०१० मध्ये साक्षी हिच्यासोबत लग्न केलं. साक्षी आणि धोनी आज एकमेकांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. साक्षी आणि धोनी यांना एक मुलगी देखील आहे. सोशल मीडियावर देखील क्रिकेटपटूच्या लेकीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
