धुरंधर सोडा ‘या’ चित्रपटाच्या तिकीटासाठी रस्त्यावर झोपायचे लोक, 5 किमीपर्यंत लागाच्या रांगा
'स्त्री 2', 'पुष्पा 2' आणि 'धुरंधर' चित्रपटापेक्षा या चित्रपटाने गाजवला होता काळ. तिकीट खरेदी करण्यासाठी लागायच्या 5 किलोमीटर रांगा. लोक जेवणाचे डब्बे घेऊन थिएटर बाहेर झोपायचे.

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून असे काही चित्रपट प्रदर्शित झाले ज्यांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला. यामध्ये ‘स्त्री 2’, ‘पुष्पा 2’ सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. अशातच काही दिवसांपूर्वी अक्षय खन्ना आणि रणवीर सिंग यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरधंर’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर आपले स्थान निर्माण केले. या चित्रपटाने काही आठवड्यांमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकत नंबर 1 वर स्थान मिळवले.
मात्र, आता या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘स्त्री 2’ आणि ‘पुष्पा 2’ यांना मागे टाकलं आहे. पण बॉलिवूडमध्ये असा एक चित्रबपट आहे ज्याचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेले नाही.
हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात असे काही मोजकेच चित्रपट आहेत जे केवळ यशस्वी ठरले नाहीत तर त्यांनी संपूर्ण चित्रपटाचा चेहरामोहरा बदलून टाकला. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘मुघल-ए-आझम’. हा चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य, कल्ट आणि ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो.
‘मुघल-ए-आझम’ ही केवळ एक प्रेमकथा नव्हती तर प्रेम, त्याग, सत्तासंघर्ष आणि बंडखोरी यांचा भव्य संगम होता. हा चित्रपट अशा काळात प्रदर्शित झाला जेव्हा चित्रपट म्हणजे जादू मानला जायचा आणि थिएटर हे मंदिरासारखे पूजले जायचे.
16 वर्षांचा संघर्ष आणि भव्य निर्मिती
‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाचे चित्रीकरण 1944 साली सुरू झाले आणि तब्बल 16 वर्षांनंतर 1960 मध्ये ते पूर्ण झाले. एवढा प्रदीर्घ काळ लागलेला हा चित्रपट त्या काळातच चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपटाच्या निर्मितीवर अफाट खर्च झाला होता. अनेकदा आर्थिक अडचणींमुळे दिग्दर्शक के. आसिफ यांना संघर्ष करावा लागला असेही सांगितले जाते.
मात्र, जेव्हा हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याने संपूर्ण देशात इतिहास रचला. बॉक्स ऑफिसवर त्याने वर्षानुवर्षे राज्य केलेच पण त्यासोबतच राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठित सन्मानही पटकावले. आजही ‘मुघल-ए-आझम’चे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे.
तिकीटांसाठी रस्त्यावर झोपायचे प्रेक्षक
त्या काळातील चित्रपटाची लोकप्रियता आजच्या पिढीला कल्पनाही करता येणार नाही अशी होती. ‘मुघल-ए-आझम’ पाहण्यासाठी लोक थिएटरबाहेर रस्त्यावर झोपायचे. ही बाब आजही आश्चर्यचकित करणारी आहे. अनेक प्रेक्षक आपली कामे आटोपून घरातून जेवणाचे डबे घेऊन थिएटरबाहेर रांगेत उभे राहायचे.
रात्री उघड्यावर झोपून सकाळी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करणारे प्रेक्षक त्या काळात सामान्य दृश्य होते. काही शहरांमध्ये तर थिएटरबाहेर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या असायच्या. आजच्या डिजिटल युगात, ऑनलाइन बुकिंगच्या सवयींमध्ये ही गोष्ट ऐकूनही अविश्वसनीय वाटते. मात्र, तोच त्या काळातील चित्रपटांचा खरा प्रभाव होता.
