Kangana Ranaut | कंगना पोलखोल करण्याची शक्यता, मुंबई पोलीस चौकशीला बोलावण्याच्या तयारीत

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौतचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. Mumbai Police may call Kangana Ranaut

Kangana Ranaut | कंगना पोलखोल करण्याची शक्यता, मुंबई पोलीस चौकशीला बोलावण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: Jul 22, 2020 | 7:22 PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अनेकांना चौकशीला बोलावलं जात आहे. आता याप्रकरणात अभिनेत्री कंगना रनौतचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. कंगना रनौतने सिनेक्षेत्रातील नेपोटिझम किंवा घराणेशाहीविरोधात अनेकदा जाहीर वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर सुशांतची आत्महत्या एकप्रकारे सुनियोजित हत्याच आहे, असं कंगना म्हणाली होती.

सुशांतच्या आत्महत्येमागे काही लोक असल्याचा आरोप कंगनाने केला होता. अनेक ठिकाणी तिने मुलाखती दिल्या आहेत. सुरुवातीपासून ती सुशांतच्या आत्महत्येवरुन थेट बोलत आहे. (Mumbai Police may call Kangana Ranaut)

Kangana on Sushant Suicide | इंडस्ट्रीतील कंपूशाहीने सुशांतचा बळी घेतला, कंगनाचा बॉलिवूडवर संताप

यामुळे सुरुवातीला तिला पोलिसांनी चौकशीला बोलावलं होतं. कायदेशीर बाब म्हणून तिला समन्सही देण्यात आला होता. समन्स देण्यासाठी पोलीस गेले असता कंगना हिच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी समन्स घेतला नव्हता. कंगना पोलिसांना माहिती देण्यासाठी पुढे आली नव्हती. मात्र, सुशांत सिंहच्या आत्महत्येबाबत कंगनाकडून सातत्याने प्रश्न उपस्थित करणे सुरुच आहे.

वाचा :  Sushant Singh Rajput | संजय लीला भन्साळी यांनी सुशांतबाबत पोलिसांना काय सांगितलं? 

पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 38 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये पोलीस व्यस्त आहेत. आणखी चार ते पाच महत्वाच्या व्यक्तींचे जबाब पोलिसांना नोंदवायचे आहेत. हे काम संपल्यावर पोलीस पुन्हा कंगना रनौतला समन्स बजावून जबाब देण्यासाठी बोलावण्याची शक्यता आहे.

कंगनाकडे जर सुशांत सिंह प्रकरणाची काही महत्वाची माहिती असल्यास आणि त्यामुळे जर तपासाला मदत होणार असेल तर आम्ही नक्की कंगना यांना समन्स पाठवून बोलावू. मात्र , यावेळी कंगना यांनी आम्हाला मदत करणं आवश्यक असल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

गेल्या काही दिवसापासून कंगना स्वतः आता आपल्याला पोलिसांनी बोलावल्याचं सांगत आहे. आपण सध्या मुंबईबाहेर आहोत. आपलं म्हणणं जाणून घ्यायचं असल्यास , आपला जबाब घ्यायचा असल्यास आपण ई मेल द्वारे जबाब द्यायला तयार असल्याचं तिने म्हटलं आहे. मात्र , प्रत्यक्षात तिने कोणतंही समन्स स्वीकारलेलं नाही. (Mumbai Police may call Kangana Ranaut)

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput | संजय लीला भन्साळी यांनी सुशांतबाबत पोलिसांना काय सांगितलं?

Sushant Singh Rajput | दिग्दर्शक शेखर कपूर यांचा मुंबई पोलिसांना धक्कादायक ई-मेल 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.