मुसलमान पुरुष राक्षस, तर हिंदू महिला निर्बुद्ध… स्वरा भास्कर हिने का केलं वादग्रस्त विधान?

अभिनेत्री स्वरा भास्कर कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री मुसलमान पुरुष आणि हिंदू महिलांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त स्वरा भास्कर हिच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

मुसलमान पुरुष राक्षस, तर हिंदू महिला निर्बुद्ध... स्वरा भास्कर हिने का केलं वादग्रस्त विधान?
अभिनेत्री स्वरा भास्कर
| Updated on: Mar 13, 2026 | 9:29 AM

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या सिनेमांमुळे कमी पण, वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधिक चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने हिंदू महिला आणि मुस्लीम पुरुषांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमावर स्वतःची स्पष्ट भूमिका मांडली आहे. स्वरा कायम वादग्रस्त मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडत असते. यापूर्वी अभिनेत्रीने दिल्ली येथील उत्तर नगर हत्याकांडावर प्रतिक्रिया दिलेली. आता अभिनेत्री ‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमात मुसलमान पुरुषांना राक्षस असल्याचं दाखवलं आहे… असं सांगितलं आहे… सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत सिनेमाच्या माध्यमातून एका समुदायाप्रती नकारात्मकता पसरवली जात आहे. ‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमाचा एक पोस्टर शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘जर तुम्ही द केरळ स्टोरी 2 सिनेमाचा ट्रेलर पाहिला असेल तर, तुम्हाला कळलं असेल की, सिनेमात मुस्लीम पुरुषांना राक्षस दाखवण्यात आलं आहे.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमाची संपूर्ण कथा समजली नसावी… पण सिनेमाच्या कथेत हिंदू महिलांना सुद्धा असं दाखवण्यात आलं आहे की, त्या निर्बुद्ध आहे.’ म्हणजे त्यांच्यामध्ये समज कमी आहे… ‘हिंदू महिलांना असं दाखवण्यात आलं आहे की, त्या प्रचंड साध्या आणि त्यांना सहजपणे प्रभावित केलं जाऊ शकतं. स्वतःकडून झालेल्या चुका लपवण्यासाठी हिंदू महिलांना दुसऱ्याची गरज भासते…. असं दाखवण्यात आलं आहे. ‘

‘हिंदुत्वाचं समर्थन करणाऱ्या महिलांसाठी, हा सिनेमा हिंदू राष्ट्रात महिलांची स्थिती गौण असू शकते याची आठवण करून देतो. ‘द केरळ स्टोरी 2′ सिनेमातून फक्त द्वेष पसरवण्याचं काम केलं आहे…’, असं देखील पोस्टमध्ये स्वरा भास्कर म्हणाली आहे.

‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमातं बॉक्स ऑफिस

कामाख्या नारायण सिंग दिग्दर्शित सिनेमात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सिनेमात हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबत लग्न करुन, बळजबरी धर्मांतर केल्याचं दाखवण्यात अलं आहे. 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने आतापर्यंत 46.93 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Follow Us