AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naga Chaitanya Net Worth | नागा चैतन्य आहे कोट्यवधींचा मालक , जाणून घ्या किती आहे त्याची संपत्ती

नागा चैतन्य तेलुगु चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक आहे. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. फक्त चित्रपटसृष्टीतच नसून त्याने उद्योग क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. आज आपण त्याचा मालमत्ताने विषयी आणि चित्रपटांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Naga Chaitanya Net Worth | नागा चैतन्य आहे कोट्यवधींचा मालक , जाणून घ्या किती आहे त्याची संपत्ती
naga-chaitanya.
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 7:17 PM
Share

मुंबई : साऊथचा सुपरस्टार नागार्जुन याचा मुलगा नागा चैतन्यनेही इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज नागा चैतन्य आणि त्याची पत्नी सामंथा अक्किनेनी यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याची माहिती त्याने त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियावर दिली आहे.

नागा चैतन्य तेलुगु चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक आहे. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. फक्त चित्रपटसृष्टीतच नसून त्याने उद्योग क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. आज आपण त्याचा मालमत्ताने विषयी आणि चित्रपटांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

नागा चैतन्य याचे नेटवर्थ

Caknowledge.com च्या अहवालानुसार, नागा चैतन्यने फार कमी वेळात कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, नागा चैतन्य 154 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत. चित्रपटांबरोबरच तो अनेक ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीदेखील करतो

नागा चैतन्याचे घर

नागा चैतन्यकडे भरपूर मालमत्ता आहे. तो एक भव्य जीवनशैली जगतो आणि त्याचे संपूर्ण घर सर्व सेवासुविधांनी परिपूर्ण आहे.

लक्झरी बाईक छंद नागा चैतन्यला बाईकची खूप आवड आहे. त्याच्याकडे सर्वात महागड्या बाईक्सचं कलेक्शन आहे. त्याच्या यादीमध्ये यामाहा YZF R1 सह अनेक बाईक्सचा समावेश आहे.

व्यावसायिक कारकीर्द नागा चैतन्यच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात जोश या चित्रपटातून केली. त्यांचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला आहे. लवकरच त्याचा लव्हस्टोरी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. याशिवाय नागा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. तो आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. त्याने त्याचे शूटिंग पूर्ण केले आहे.

वैयक्तिक जीवन नागाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना, त्याने दोन वर्षे अभिनेत्री समंथा हिला डेट केले, त्यानंतर दोघांनी लग्न केले. 29 जानेवारी 2017 रोजी नागा आणि समंथा यांचे लग्न झाले. पण आता दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या 

Boycott Bigg Boss 15 | सुरु होण्यापूर्वीच सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’वर बंदी घालण्याची मागणी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय…

Samantha-Naga Chaitanya Divorce | अफेयर, करिअर की आणखी काही? समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय?

Samantha-Naga Chaitanya Divorce | ‘आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे…’, समंथा-नागा चैतन्यने केली घटस्फोटाची घोषणा!

(Samantha-Naga Chaitanya Divorce know all about naga chaitanya bikes and net worth)
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.