AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boycott Bigg Boss 15 | सुरु होण्यापूर्वीच सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’वर बंदी घालण्याची मागणी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय…

अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने होस्ट केलेला शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss 15) प्रेक्षकांना खूप आवडतो. सलमान अनेक वर्षांपासून हा शो होस्ट करत आहे. आता ‘बिग बॉसचा 15 वा सीझन’ आजपासून म्हणजेच शनिवारी रात्रीपासून सुरू होईल.

Boycott Bigg Boss 15 | सुरु होण्यापूर्वीच सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’वर बंदी घालण्याची मागणी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...
Salman Khan
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 12:55 PM
Share

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने होस्ट केलेला शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss 15) प्रेक्षकांना खूप आवडतो. सलमान अनेक वर्षांपासून हा शो होस्ट करत आहे. आता ‘बिग बॉसचा 15 वा सीझन’ आजपासून म्हणजेच शनिवारी रात्रीपासून सुरू होईल. आज या शोचा प्रीमियर आहे, पण शो सुरू होण्यापूर्वीच त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.

सध्या सोशल मीडियावर Boycott Bigg Boss 15 ट्रेंड करत आहे. प्रत्येकजण वेगवेगळी कारणे देऊन शोवर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहे. जरी प्रत्येकाचे कारण वेगळे असले तरी प्रत्येकाची मागणी आहे की, या शोवर बंदी घालावी.

पाहा नेटकरी का करतायत विरोध…

रणवीर प्रीमियरला येणार

‘बिग बॉस 15’च्या प्रीमियरमध्ये रणवीर सिंहही येणार आहे. वास्तविक, रणवीर त्याच्या शो ‘द बिग पिक्चर’च्या प्रमोशनसाठी येणार आहे. याशिवाय, शोचा आणखी एक प्रोमोही समोर आला आहे, ज्यामध्ये असीम रियाज त्याचा भाऊ उमरला सोडायला आला होता.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

असिम भावाला सोडायला आला!

सलमानने असीमला उमरबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, त्यात आग, भावना आणि राग आहे. उमर खूप घाबरला होता, पण मी त्याला समजावले की, हा एक रिअॅलिटी शो आहे. हा एक क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा खेळ आहे.

घरात प्रवेश करणारे स्पर्धक

या सीझनचे आत्तापर्यंतचे निश्चित झालेले स्पर्धक म्हणजे शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, उमर रियाज, प्रतीक सहजपाल, निशांत भट्ट, आकासा, करण कुंद्रा, डोनाल बिष्ट, साहिल श्रॉफ, मिशा अय्यर.

रिया चक्रवर्तीचे नावही आले समोर

तसे, या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नावही समोर येत होते. असे म्हटले जात होते की, रिया देखील या शोमध्ये सहभागी होणार आहे. एवढेच नाही तर या शोसाठी अभिनेत्रीला दर आठवड्याला 35 लाख रुपये मिळत असल्याच्या बातम्या देखील येत होत्या. तथापि, नंतर एक अपडेट आले की अभिनेत्रीने ही मोठी ऑफर नाकारली. त्यामुळे कदाचित रिया या हंगामात शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार नाहीय.

हेही वाचा :

Sara Ali Khan | शर्टची बटणं उघडून सारा अली खानचं फोटोशूट, ‘सनकिस्ड’ फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

Gandhi Jayanti 2021: ‘लगे रहो मुन्ना भाई’ पासून ते ‘गांधी माय फादर’ पर्यंत, गांधीजींच्या जीवनावर आधारित ‘हे’ चित्रपट देतील प्रत्येकाला प्रेरणा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.