Samantha-Naga Chaitanya Divorce | ‘आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे…’, समंथा-नागा चैतन्यने केली घटस्फोटाची घोषणा!

गेल्या अनेक दिवसांपासून समंथा अक्किनेनी आणि नाग चैतन्यच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. अखेर आज दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे.

Samantha-Naga Chaitanya Divorce | ‘आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे...’, समंथा-नागा चैतन्यने केली घटस्फोटाची घोषणा!
naga chaitanya-Samantha

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आणि नाग चैतन्यच्या (Naga Chaitanya) घटस्फोटाची चर्चा सुरु होती. अखेर आज दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. काही काळापूर्वी दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीने (Samantha Akkineni ) सोशल मीडियावरून ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून टाकले होते. नागा चैतन्यशी लग्नानंतर अभिनेत्रीने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते. मात्र आता समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामुळेच तिने आपल्या नावापुढील आडनाव काढून टाकले आहे, असे म्हटले जात होते. अखेर आता आपण वेगळं होत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

काय लिहिलंय पोस्टमध्ये?

आमच्या सर्व हितचिंतकांनो, खूप विचारविनिमयानंतर, सॅम आणि मी पती-पत्नी म्हणून आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा जास्त आहे जी आमच्या नात्याचा आधार होती. जी आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष नाते ठेवेल. आम्ही आमच्या चाहत्यांना, माध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार.

समुपदेशनही निष्फळ

अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनी यांनाही त्यांचे लग्न वाचवायचे होते, यामुळे त्यांनी समुपदेशन घेण्याचा निर्णय घेतला, पण त्याचाही विशेष फायदा झाला असे वाटत नाही. हे जोडपे त्यांच्या लग्नासंदर्भात माध्यमांमध्ये सुरू असलेल्या कोणत्याही बातमीला कोणतेही उत्तर देत नाही. याचा अर्थ असा की, माध्यमांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी एक प्रकारे बरोबर आहेत. दोघांच्या कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन देखील केले गेले आहे, परंतु तरीही या जोडप्याला एकमेकांपासून वेगळे व्हायचे आहे.

पोटगी म्हणून मिळणार 50 कोटी!

येत्या काही दिवसांत त्यांच्या  घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होईल. दैनिक भास्करच्या मते, जर हा घटस्फोट झाला, तर घटस्फोटानंतर समंथाला पोटगी म्हणून एकूण 50 कोटी रुपये मिळतील. जुलै महिन्यात अभिनेत्रीने सोशल मीडियावरून तिचे आडनाव ‘अक्किनेनी’ काढून टाकले होते. यानंतर प्रत्येकाला या जोडीतील दुराव्याची बातमी मिळाली.

समंथा आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर 2017 मध्ये लग्न केले. दोघे 2010 मध्ये ‘ये माया चेसावे’ चित्रपटात पहिल्यांदा पडद्यावर दिसले होते. दोघांच्या चाहत्यांना त्यांना नेहमी पडद्यावर एकत्र पाहणे आवडते.

‘या’मुळे रंगली घटस्फोटाची चर्चा

प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्कीनेनी आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांनी 2017मध्ये लग्न केले. दोघेही दक्षिण भारतीय मनोरंजन विश्वाची क्यूट जोडी मानली जायचे. परंतु, त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगले जात नसल्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. असेही म्हटले जाते की, नागा चैतन्य कुटुंब नियोजनाचा विचार करत होता आणि त्यासाठी त्याने समंथा हिने काही काळ चित्रपट करणे थांबवावे आणि कुटुंबाला पुढे न्यावे अशी इच्छा होती.

अहवालानुसार, सामंथा आणि नागा चैतन्यच्या वैवाहिक जीवनात दुरावा येण्याचे कारण अभिनेत्रीचे तिच्या करिअरवरील प्रेम आहे. लग्नानंतरही सामंथा चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स चित्रीत करत आहे, जे तिचे सासरे नागार्जुन यांना आवडत नाहीत. दुसरीकडे, सामंथा तिच्या कारकिर्दीत उत्तम कामगिरी करत आहे आणि या क्षणी ती काम सोडायला तयार नाही आणि आता ज्या प्रकारे तिने नवीन चित्रपट साईन केला आहे, असे दिसते की तिला खरोखरच तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. असेही म्हटले जात आहे की, सामंथाने घटस्फोटासाठी 50 कोटींची पोटगी मागितली आहे.

हेही वाचा :

Shraddha Arya | बोल्ड फोटो शेअर करत ‘कुंडली भाग्य’च्या श्रद्धा आर्याने वाढवलं इंटरनेटचं तापमान!

‘त्यांची भेट व्हावी ही कधीपासूनची इच्छा’, ‘अण्णा नाईकां’नी घेतली खासदार उदयनराजे भोसलेंची भेट!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI