‘त्यांची भेट व्हावी ही कधीपासूनची इच्छा’, ‘अण्णा नाईकां’नी घेतली खासदार उदयनराजे भोसलेंची भेट!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Oct 02, 2021 | 2:56 PM

अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘अण्णा नाईक’ फेम अभिनेते माधव अभ्यंकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा येथील जलमंदिर पॅलेस या ठिकाणी सदिच्छा भेट घेतली. खासदार उदयनराजे हे "रात्रीस खेळ चाले" या मालिकेतील अण्णा नाईक यांच्या डायलॉगचे चाहते आहेत.

‘त्यांची भेट व्हावी ही कधीपासूनची इच्छा’, ‘अण्णा नाईकां’नी घेतली खासदार उदयनराजे भोसलेंची भेट!
Anna Naik

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘अण्णा नाईक’ फेम अभिनेते माधव अभ्यंकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा येथील जलमंदिर पॅलेस या ठिकाणी सदिच्छा भेट घेतली. खासदार उदयनराजे हे “रात्रीस खेळ चाले” या मालिकेतील अण्णा नाईक यांच्या डायलॉगचे चाहते आहेत. त्यांनी बऱ्याच वेळा त्यांच्या मुलाखतीत “अण्णा नाईक असो” हा डायलॉग बोलून दाखवला आहे. यावेळी माधव अभ्यंकर यांच्या अभिनयाचे आणि त्या डायलॉग म्हणत तोंड भरून कौतुक केलंय.

या भूमिकेबाबत महाराष्ट्रातून खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या असल्याचे सांगत महाराजांनाही ‘अण्णा नाईक असो’ हा डायलॉग आवडतो हे ऐकून धन्य झालो असून, माझी पत्नी देखील उदयनराजे भोसले यांची चाहती आहे लवकरच आम्ही एकत्र महाराजांची भेट घेणार असल्याचे अभिनेते माधव अभ्यंकर म्हणाले.

महाराजांची भेट व्हावी ही कधीपासूनची इच्छा!

यावेळी आपला आनंद व्यक्त करताना अभिनेते माधव अभ्यंकर म्हणाले की, मला केव्हापासून महाराजांना भेटण्याची इच्छा होती. पण योग येत नव्हता. आज अचानक मित्रवर्य मेघराज राजेंची भेट झाली आणि ते म्हणाले की चला महाराजांना भेटायला जाऊ. मी म्हणालो देखील की, नको तिथे गर्दी असेल, आपण नंतर जाऊ. पण त्यांनी हट्ट केला आणि आमची भेट झाली.

मालिकेचं दणक्यात पुरागमन!

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाच दणक्यात पुरागमन झालं आहे. या मिलेक्च्या कथेविषयी सांगताना लेखक म्हणतो, प्रत्येक घराण्याला एक इतिहास असतो. कोणी तो शोधतो तर कोणी शोधत नाही. पण इतिहास हा असतोच. त्या त्या घराण्याचा मूळ पुरुष कोणीतरी असतो आणि त्याची वंशवेल पुढे नांदताना दिसते, ज्याला आपण पीढी म्हणतो. अशा अनेक पिढ्या त्या घराण्याच्या झालेल्या असतात. अशा एखाद्या पीढीत एखादा वंशज क्रूरकर्मा निपजतो. तो दुराचारी होऊन अराजकता माजवतो. पूर्वजांनी नेमून दिलेले कुळाचार तो पायदळी तुडवतो. स्वार्थासाठी तो पुण्याची कास सोडून पाप प्रवृत्त होतो. त्यामुळे त्याच्या हातून खून,व्यभिचार, व्यसन असली पापं घडत जातात. पण त्याचे भोग त्याच्या सर्व कुटुंबाला भोगावे लागतात.

पापं आणि शाप या एकाच नाण्याच्या दोन बाजू!

कारण  ज्यांच्यावर अन्याय झालेला असतो, त्यांचे असंतुष्ट आत्मे त्या पापी माणसाबरोबर त्याच्या घराण्याला देखील शाप देत असतात. म्हणजेच पापं आणि शाप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका पिढीने केलेलं पाप दुसऱ्या पिढीला शाप म्हणून भोगावं लागतं. परंतु पूर्वजांच्या, पूर्व पुण्याईने घराण्यातल्या सत्शील माणसा करवी त्या शापित घराण्याला उषा:पही मिळत असतो. पण त्या उ:शापासाठी घराण्यातल्या सच्छील व्यक्तीला खूप यातना सोसाव्या लागतात. त्याग करावे लागतात आणि त्यानंतरच ते घराणं शाप मुक्त होतं. म्हणजेच त्या घराण्याचा पाप…शाप… आणि उ:शाप असा एक प्रवास सुरू होतो.

अशी रंगणार नाईक वाड्याची कथा…

अशाच एका नाईक घराण्याची “रात्रीस खेळ चाले” ही कथा. अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात लागली. अतृप्त आत्म्यानी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको, इंदू उर्फ माई नाईक घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या स़कटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्रीसुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. त्याची ही एक रंजक कथा असणार आहे. नाईक घराण्याचं पाप…शाप… आणि उ:शाप यामधून झालेलं संक्रमण म्हणजेच ‘रात्रीस खेळ चाले 3’ असणार आहे.

हेही वाचा :

चित्रपटगृहात लवकरच दिसणार ‘फ्री हिट दणका’, सैराटची ‘ही’ जोडी पुन्हा दिसणार एकत्र!

Sara Ali Khan | शर्टची बटणं उघडून सारा अली खानचं फोटोशूट, ‘सनकिस्ड’ फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI