AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रपटगृहात लवकरच दिसणार ‘फ्री हिट दणका’, सैराटची ‘ही’ जोडी पुन्हा दिसणार एकत्र!

महाराष्ट्रात 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरु होणार असल्याची बातमी आली आणि इतके महिने आतुरतेने वाट पाहणाऱ्या चित्रपटसृष्टी आणि चित्रपटप्रेमींमध्ये एक उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

चित्रपटगृहात लवकरच दिसणार 'फ्री हिट दणका', सैराटची ‘ही’ जोडी पुन्हा दिसणार एकत्र!
Free Hit Danka
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 02, 2021 | 1:34 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरु होणार असल्याची बातमी आली आणि इतके महिने आतुरतेने वाट पाहणाऱ्या चित्रपटसृष्टी आणि चित्रपटप्रेमींमध्ये एक उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या चित्रपटगृहांनाही आता प्रेक्षकांची आस लागली असून लवकरच प्रेक्षक आता आपल्या आवडत्या चित्रपटाचा आनंद थिएटरमध्ये बसून घेतील. मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या प्रदर्शनाच्या तारखाही आता जाहीर होऊ लागल्या आहेत.

त्यापैकीच एक एसजीएम फिल्म्स प्रस्तुत ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुनील मगरे दिग्दर्शित या चित्रपटात ‘फँड्री’ फेम सोमनाथ अवघडे, अपूर्व एस.यांच्यासह ‘सैराट’ चित्रपटातील जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘फ्री हिट दणका’ चित्रपटगृहात!

या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांचीच असून, लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि  सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. प्रेमाच्या महिन्याचे औचित्य साधून या प्रेमकथा असलेल्या ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता लवकरच प्रेक्षकांना या प्रेमाचा दणका चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.

‘सैराट’ लोकप्रिय जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

आपल्या पहिल्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर पुन्हा तानाजी आणि अरबाज कुठे दिसतील कोणत्या चित्रपटात कोणत्या माध्यमात दिसतील असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. याला उत्तर म्हणजे सुनिल मगरे दिग्दर्शित ‘फ्री हिट दणका’ हा चित्रपट होय. मैत्रीची एक वेगळी परिभाषा मांडणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं होतं.

लॉकडाऊननंतर मनोरंजनाची गाडी सुसाट!

लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा जोमाने चित्रपटसृष्टी काम करू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘फ्री हिट दणका’ या नवीन चित्रपटाची घोषणा एस.जी.एम या चित्रपट निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाला सुनिल मगरे हे दिग्दर्शन तर संजय नवगिरे हे या चित्रपटाचे संवाद, पटकथा आणि गीत लेखन करणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उमेश नरके, धर्मेंद्र सिंग, प्रसाद शेट्टी, विकास कांबळे, प्रवीण जाधव आणि दिग्दर्शक सुनिल मगरे सांभाळत असून सुधाकर लोखंडे हे या चित्रपटाचे सह निर्माता आहेत. या चित्रपटाचे प्रोडक्शन मॅनेजर राजू दौलत जगताप तर संगीत बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी केले असून चित्रपटाचे छायाचित्रण वीरधवल पाटील करणार आहेत.

हेही वाचा :

Boycott Bigg Boss 15 | सुरु होण्यापूर्वीच सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’वर बंदी घालण्याची मागणी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय…

महिला सशक्त व्हायला हव्यात, गुन्हा घडण्यापूर्वी कायद्याची शिक्षेची भीती वाटायला हवी : अलका कुबल

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...