AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन अहिर यांची पंकजा मुंडेंच्या विधानावर थेट प्रतिक्रिया, म्हणाले, राजकारणाच्या पलीकडे

शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी राज्यातील अनेक विषयांवर मोठे भाष्य केले. पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानावर बोलताना सचिन अहिर दिसले. त्यांनी संजय राऊत यांच्यावरहीी जोरदार टीका केली.

सचिन अहिर यांची पंकजा मुंडेंच्या विधानावर थेट प्रतिक्रिया, म्हणाले, राजकारणाच्या पलीकडे
Sachin Ahir and Pankaja Munde
| Updated on: Nov 22, 2026 | 11:57 AM
Share

सचिन अहिर यांनी नुकताच मोठे विधान केले. सचिन अहिर यांनी रामराव वडकुते यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत म्हटले की, अतिशय दुखद घटना आहे, आम्ही सोबत काम केलं होतं, महामंडळावर विधानपरिषद प्रश्न मांडण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यांना विधान परिषदेची इच्छा होती, भारतीय जनता पार्टीने त्यांना राज्यसभा दिली. आज ती घटना ऐकताना मला दुःख झालं, कुटुंब यांच्या त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आनंदराज आंबेडकर यांनी अजित पवार यांच्याबद्दलच्या विधानावर बोलताना अहिर यांनी म्हटले की, दुर्दैवी आहे, अशा पद्धतीने मोठ्या नेत्यांना बोलणं चुकीचं आहे. मात्र, ते असं काही बोलले असेल तर त्यांनी खेद व्यक्त केला पाहिजे. मराठवाड्यातील दुष्काळावर बोलताना त्यांनी म्हटले की, जालना, अमरावतीला मी जाऊन आलो मदत देण्याचे काम केलं. नांदेडला देखील मोठ्या प्रमाणात मदत करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे.

ज्या ज्या भागात अशी परिस्थिती आहे त्या भागात पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली जाते. विधिमंडळाच्या अधिवेशन नागपूरला होणार आहे. यावेळेस शेतकऱ्याचे प्रश्नावर चर्चा घडवण्याचा प्राधान्याने प्रयत्न राहणार आहे. शासनाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका व्हावी असे आमचे पर्यत आहेत.

डीलिमिटेशनसाठी एका खासदाराची किंमत 150 कोटी रुपये असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. यावर बोलताना सचिन अहिर यांनी म्हटले की, मला आश्चर्य वाटतंय, जर असं जर त्यांचं म्हणणं असेल तर सुप्रिया ताईंना काही ऑफर झाली का हे त्यांनी सांगावं, सुप्रियाताई काल पण सांगितले मला कोणी काही बोललं नाही. पृथ्वीराज चव्हाण सुद्धा ती लिमिटेशनच्या विरोधात सकारात्मक भूमिका घेत आहेत.

मोदींचा राजयोग संपला असे विधान राऊतांनी केले, यावर बोलताना सचिन अहिर यांनी म्हटले की, अशा तारखा आपण अगोदर सुद्धा ऐकल्या आहेत, लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेलं सरकार मग ते कोणाला पटो न पटो, फक्त आपल्या लोकांना आपले आमदारांना समाधान वाटावं म्हणून हे वक्तव्य करतात. आदित्य ठाकरे यांनी आरोप केला की,  महाराष्ट्रात 80 टक्के दुष्काळ मात्र केंद्राची मदत नाही.

यावर बोलताना अहिर यांनी म्हटले की, केंद्राची मदत पोहोचली पाहिजे, केंद्राच्या टीमने पाहणी दौरा केला आहे. देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा दोन वेळा महाराष्ट्राच्या पाठीमागे आपण उभा आहोत हा संकेत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानावर बोलताना त्यांनी म्हटले, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लोकनेते ही पदी भेटते त्यांनी देखील राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाचं काम करतात त्यांना कुटुंबाचा वारसा आहे ते वारसा जपण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती ती पार पाडण्याचे काम त्यांनी केला आहे.

Follow Us
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
Vilas Londhe : टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी स्पष्ट केली भूमिका
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर सांगितलं रंजक गुपित
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद...
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद, प्रदूषणातही वाढ
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!