AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naal 2 : ‘चैतू’ची आई आता तरी त्याच्याशी बोलणार का? ‘नाळ 2’चा दुसरा टीझर पाहिलात का?

नागराज मंजुळे निर्मित 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाळ’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले. आता या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Naal 2 : 'चैतू'ची आई आता तरी त्याच्याशी बोलणार का? 'नाळ 2'चा दुसरा टीझर पाहिलात का?
Naal 2Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 21, 2023 | 5:40 PM
Share

मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : ‘नाळ’च्या या चित्रपटाच्या पहिल्या भागात चैतूची आई त्याच्याशी न बोलताच निघून गेली होती. आता चैतू त्याच्या आईला पश्चिम महाराष्ट्रात भेटायला जाणार आहे. मात्र आता इतकी वर्षं झाल्यानंतर त्यांच्यातील हा दुरावा निवळेल का? चैतू त्याच्या आईकडे येईल का? त्यांच्यातील हा अबोला संपेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असतील. परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना येत्या 10 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात मिळणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये चैतू त्याच्या आईबरोबर दिसत आहे. मात्र त्यांच्या नात्याची नाळ जुळली आहे का, हे अद्यापही अनुत्तरित आहे. याचा उलगडा आता लवकरच होणार आहे.

‘नाळ भाग 2’च्या पहिल्या टीझरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘भिंगोरी’ गाणंही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. ‘आई मला खेलायला जायचंय’ या गाण्याप्रमाणेच ‘भिंगोरी’ या गाण्याचे व्ह्यूजही दिवसेंदिवस वाढत आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ भाग 2’चं  दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यंक्कट्टी यांनी केलं आहे. ‘नाळ’ ने प्रेक्षकांशी नाळ जोडली. राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. आता ‘नाळ भाग 2’ लवकरच पहिल्या भागातील आठवणींचा खजिना मोठा चैतू पुन्हा उलगडणार आहे.

पहा टीझर 2

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘भिंगोरी’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याला मास्टर अवन, कडुबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांचा आवाज लाभला आहे. मराठी लोकगायिका कडुबाई खरात यांच्या आवाजातील हे पहिलंच चित्रपट गाणं आहे. औरंगाबादच्या कडुबाई खरात या डॉ. आंबेडकर यांच्यावर गाणी गाण्यासाठी ओळखल्या जातात. ‘मह्या भीमानं सोन्यानं भरलिया ओटी..’ हे त्यांचं गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. कडुबाई या बाबासाहेबांवरील गाणं म्हणून मिळणाऱ्या भिक्षेवर आपलं घर चालवतात. त्यांना पहिल्यांदाच चित्रपटात गाण्याची संधी मिळाली आहे. ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी ही संधी दिली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.