AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकरांचा मराठी चित्रपट, तयार होऊनही 2 वर्षे प्रदर्शित झाला नाही, मात्र, नंतर बघताना लोक घाबरायचे

नाना पाटेकर यांचा मराठी चित्रपट, तयार होऊन देखील दोन वर्षे प्रदर्शित झालाच नाही. बघताच लोक थरथर कापायचे. सेन्सॉर बोर्डाने काही सीन डिलेट करण्याची केलेली मागणी.

नाना पाटेकरांचा मराठी चित्रपट, तयार होऊनही 2 वर्षे प्रदर्शित झाला नाही, मात्र, नंतर बघताना लोक घाबरायचे
maaficha sakshidarImage Credit source: Social media
| Updated on: Oct 08, 2026 | 4:59 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कारकिर्दीतील अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘माफीचा साक्षीदार’ हा मराठी क्राइम चित्रपट. विशेष म्हणजे, या चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी तब्बल दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती.

1986 मध्ये प्रदर्शित झालेला ‘माफीचा साक्षीदार’ हा चित्रपट दत्ता भट, बिंदू देसाई, मोहन गोखले आणि नाना पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला क्राइम ड्रामा चित्रपट होता. हा चित्रपट 1970 च्या दशकाच्या मध्यात पुण्यात घडलेल्या चर्चित जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर आधारित होता. नाना पाटेकर यांनी या चित्रपटात सायको व्हिलनची भूमिका साकारली होती. त्यांनी ही भूमिका अत्यंत तीव्रतेने आणि प्रभावीपणे पडद्यावर उभी केली.

दोन वर्षे चित्रपट अडकून पडला

मात्र, चित्रपट तयार झाल्यानंतर त्याच्या प्रदर्शनाचा मार्ग खडतर ठरला. ‘माफीचा साक्षीदार’ तब्बल दोन वर्षे सेन्सॉर बोर्डाकडे अडकून पडला होता. चित्रपटातील काही सीनवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण दिल्लीतील रिव्हायझिंग कमिटीकडे पाठवण्यात आले. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला मोठा विलंब झाला. या काळात निर्मात्यांना आर्थिक नुकसान तर सोसावे लागलेच, शिवाय चित्रपटाच्या पटकथेतही अनेक बदल करावे लागले.

नाना पाटेकरांचा आवाज काढून डबिंग करण्यात आलेला चित्रपट

या सगळ्या प्रक्रियेदरम्यान चित्रपटाच्या दिग्दर्शनातही बदल झाला. राजदत्त यांनी वैयक्तिक कारणांमुळे दिग्दर्शनाची जबाबदारी सोडली. त्यानंतर व्ही. रवींद्र यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. काही सीन पुन्हा शूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर चित्रपटाला हिंदीमध्ये ‘फांसी का फंदा’ या नावाने डब करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, हिंदी आवृत्तीसाठी नाना पाटेकर यांनी स्वतः डबिंग केले नव्हते; एका डबिंग आर्टिस्टने त्यांचा आवाज दिला होता.

‘माफीचा साक्षीदार’ हा चित्रपट नाना पाटेकरांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. कठीण परिस्थितीतही त्यांच्या अभिनयातील तीव्रता आणि वेगळेपणा या भूमिकेतून प्रकर्षाने जाणवतो.

Follow Us
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र