बडे दिलवाला! बॉलिवूडमधील या जिवलग मित्रासाठी नाना पाटेकरांनी गहाण ठेवलं होतं स्वत:चं घर
नाना पाटेकर यांची हटके स्टाइल प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच जादू करते. पण नाना मित्र म्हणून कसे आहेत हे फार कमी जणांना माहित आहे. नाना यांनी बॉलिवूडमधील आपल्या एका मित्रासाठी चक्क स्वत:चं घर गहाण ठेवलं होतं. एवढा मोठा निर्णय कदाचितच कोणी घेऊ शकेल.

बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या स्टाईलने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. नाना पाटेकर यांनी फार संघर्षातून करिअरची सुरुवात केली आहे. ते लहान असताना, शाळेत गेल्यानंतर त्यांना मुंबईतील चुनाभट्टी येथे कामावर जावे लागत असे, जे त्यांच्या शाळेपासून 8 किमी अंतरावर होते. कुटुंबात 7 भावंडे होती, त्यापैकी 5 भावंडांचा मृत्यू झाला.
मित्रासाठी जे केलं ते कदाचितच कोणी करू शकेल
पण जेव्हा नाना पाटेकर बॉलिवूडमध्ये आले तेव्हा सुरुवातील त्यांनाही बराच संघर्ष करावा लागला होता. तो काळ असा होता की बऱ्याचदा चित्रपट अर्धवट बनल्यानंतर बजेट कमी पडल्याने ते बंद करावे लागायचे. अमिताभ बच्चनपासून ते सनी देओलपर्यंत असे अनेक स्टार आहेत ज्यांचे चित्रपट अर्धवट राहिले. कधी बजेट चित्रपट पूर्ण करण्यात अडथळा ठरले, तर कधी इतर काही कारणांमुळे. नाना पाटेकरांच्या बाबतीतही असचं झालं होतं. पण त्यांनी त्यांच्या मित्रासाठी जे केलं ते कदाचितच कोणी करू शकेल.
ही त्या काळाची गोष्ट आहे जेव्हा कलाकारांना चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी करोडो-लाखो मानधन मिळत नव्हते. काही हजारांवर चित्रपट साइन करणाऱ्या कलाकारांनी या रकमेतून आपली स्वप्ने पूर्ण केली. त्यातीलच एक होते नाना पाटेकर.
नाना यांना 10 हजार रुपये मानधनही ठरवण्यात आले होते
1986 साली आलेला ‘अंकुश’ चित्रपट दिग्दर्शक एन चंद्रा यांचा हा पहिला चित्रपट होता. 37 वर्षांपूर्वी बनवलेल्या या चित्रपटाची किंमत 12 लाख रुपये होती. एन चंद्रा यांनी चित्रपटात काम करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या जवळजवळ सर्व कलाकारांची निवड केली. त्यांनी नाना पाटेकर यांना त्याच प्रकारे या चित्रपटासाठी साइन केले होते. त्यांनी नाना यांना 10 हजार रुपये मानधनही ठरवण्यात आले होते. ज्यापैकी 3 हजार चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी त्यांना देण्यात आले होते आणि उर्वरित 7 हजार चित्रपटाच्या शूटिंगनंतर देण्यात येणार होते. तेही जर चित्रपट वितरकांनी विकत घेतला असेल तरच.
चित्रपट पूर्ण करण्यासाठी 2 लाखांची आवश्यकता होती
नाना पाटेकर यांनी मनापासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले, परंतु काही दिवसांनी निर्मात्याकडे पैसे संपल्याने चित्रीकरण थांबवावे लागले. चित्रपट पूर्ण करण्यासाठी 2 लाखांची आवश्यकता होती. त्यावेळी नाना पाटेकर यांची इच्छा होती की चित्रपट पूर्ण झाल्यावर त्यांना मिळणाऱ्या 7 हजार रुपयांतून ते एक स्कूटर खरेदी करतील. त्यांनी हे दिग्दर्शक एन चंद्रा यांनाही सांगितले होते.

nana patekar
नाना पाटेकर यांनी मित्रासाठी घर गहाण ठेवलं
त्यांनी खूप प्रयत्न केले, पण जेव्हा त्यांना चित्रपट पूर्ण करण्यासाठी 2 लाख रुपये जमवता आले नाहीत, तेव्हा नाना पाटेकर यांनी मित्रासाठी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी त्यांचे घर गहाण ठेवले आणि चित्रपट निर्मात्याला 2 लाख रुपये दिले. चित्रपट तयार झाला आणि प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच हिट ठरला सोबतच निर्मात्यासह सर्वांनाच फायदा झाला.
चित्रपट हीट ठरला अन्…
दिग्दर्शक एन चंद्रा यांनी नाना पाटेकर यांची ही मदत स्वीकारली होती. जेव्हा चित्रपट हीट झाला तेव्हा एन चंद्रा यांनी 2 लाख रुपये देऊन नाना पाटेकरांचे घर सोडवले एवढंच नाही तर त्यांना 7 हजार रुपये आणि एक नवीन स्कूटरही भेट म्हणून दिली. हा तोच चित्रपट आहे ज्याची कथी तर हीट तर ठरलीच पण त्यातील ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ हे गाणंही सुपरहीट ठरलं, आजही हे गाणं लोक आवर्जून ऐकतात.
