Nana Patekar : ‘काही तरी नक्कीच घडलं..’, नानांच्या आकस्मिक मृत्यूबाबत पुतण्याला घातपाताचा संशय!
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पण त्यांच्या आकस्मिक मृत्यूबाबत पुतण्याने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे संपूर्ण चौकशी व्हावी असं, नाना पाटेकरांच्या पुतण्याने सांगितलं आहे.

Nana Patekar : मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आता त्यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नाना पाटेकर यांच्या लाईफस्टाईलवर त्यांचा पुतण्या अनिरुद्ध याने प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. अनिरुद्ध याचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. अनिरुद्ध याने सांगितल्यानुसार, नाना पाटेकर कायम डाएट फॉलो करायचे व्यायाम करायचे. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांच्या पुतण्याने सांगितल्यानुसार, ‘ते कायम त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायचे. त्यांचं अतस्मितन निधन विश्वास न बसणारं आहे.’
नाना पाटेकर यांचा पुतण्या पीटीआयसोबत बोलताना म्हणाला, ‘त्यांची प्रकृती स्थिर होती. पुण्यातील त्यांच्या घरी जीम देखील होती. ते घरात पिकवलेल्याच भाज्या खायचे. त्यांच्या खाण्यात कोणतीच अडचण नव्हती. काही तरी नक्कीच घडलं असेल… जे काही सोर्सेस आहे, त्यानुसार माहिती मिळेलच…’
नाना पाटेकर यांचे कुटुंबियांसोबत कसे होते संबंध?
यावर अनिरुद्ध म्हणाला, ‘त्यांच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण जग त्यांच्याकडे एक अभिनेता म्हणून पाहत होतं. पण आम्ही त्यांना नात्याने ओळखत होतो. नाना पाटेकर मोठे स्टार होते, पण कायम साधं आयुष्य जगायचे… ते कुटुंबियांना जेवढं महत्त्व देत होते, तेवढंच महत्त्व ते बाहेरच्या लोकांना देखील देत होते…’, असं वक्तव्य अनिरुद्ध यांनी केलं आहे.
वेळेत रुग्णालयात पोहचू शकले नाहीत नाना पाटेकर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नाना पाटेकर जेव्हा गोव्यातील त्यांच्या घरी होते, तेव्हा त्यांना कार्डियक अरेस्ट आला होता. त्यांनी त्रास होत असल्याचं एका मित्राला सांगितलं होतं, परंतु उशिरा रात्री योग्य वेळी संपर्क होऊ शकल्यामुळे त्यांना वेळेत रुग्णालयात पोहोचवता आलं नाही. नाना पाटेकर यांनी 1978 च्या ‘गमन’ सिनेमातून पदार्पण केलं. ‘सलाम बॉम्बे’नंतर ते ‘परिंदा’मध्ये झळकले, त्यानंतर ‘प्रहार’, ‘राजु बन गया जेंटलमैन’, ‘अंगार’, ‘तिरंगा’ आणि ‘क्रांतीवीर’ यांसारख्या सिनेमांमुळे नाना पाटेकर लोकप्रिय झाले.
