Nana Patekar : शाबासकीचा गुद्दा दिलात, मागच्या महिन्यात निवांत गप्पा झाल्या…नाना पाटेकरांच्या निधनावर मराठी कलाकारांकडून हळहळ व्यक्त
Marathi Actors On Nana Patekar : मराठी कलाकारांनी नाना पाटेकरांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांचं आज वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे. कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठी अभिनेत्री सायली संजीवनं पोस्ट करत लिहिलं की, ‘प्रवेश सरला अंक बदलला, अंधारात मंच मिळाला…पुन्हा तुझ्या स्तव याच तमातून नवा मंच उजळेल……! नाना.. हे शब्द तुमच्यासाठी लिहायची इच्छाच होत नाहीये….भावपूर्ण श्रद्धांजली’
मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं लिहिलं की, ‘अधिकार काय असतो, हे तुमच्याकडून शिकलो. तुमचा आम्हा सगळ्यांवर अधिकार होता. आम्हला हसवलं, रडवलं, पोटभर जेऊ घातलं, मायेनं डोक्यावरून हात फिरवला, शाब्बासकीची थाप नाही तर शाब्बासकीचा गुद्दा दिलात, कधी रागावलात तर कधी वडिलांसारखं समजावून सांगितलंत. हे सगळं तुम्ही अधिकाराने केलंत. आणि त्याच अधिकाराने तुमच्या प्रत्येक भूमिकेतून प्रत्येकाच्या मनावर राज्य केलत. नानांची वाडी लक्षात राहील, नानांच्या हातची मिसळ लक्षात राहील, नानांचं ओरडणं, प्रेमाने हाक मारणं, टिंगल करणं आणि कॅमेरा समोर गेल्यावर एका जादूगाराला पण हैराण करेल असा तुमचा अभिनय, सगळं लक्षात राहील. पु. लंच्या आयुष्यात रावसाहेब येऊन गेले. आमच्या आयुष्यात नाना. पद्मश्री नाना पाटेकर ह्यांना भावपूर्ण आदरांजली.’
गौराव मोरेची पोस्ट
‘तुमच्यासारखा नटसम्राट कधीच होणे नाही. आपण आमचा अभिमान आहात, स्वाभिमान आहात आणि कायम रहाल. आपण मला दिलेला आशीर्वाद मी कधीच विसरणार नाही…साहेब आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली’
View this post on Instagram
निलेश साबळेनं लिहिलं की, ‘खरा नटसम्राट…! असा नट पुन्हा होणे नाही….” असंख्य आठवणी, असंख्य भूमिका, असंख्य गगनभेदी संवाद, भारतीय चित्रपट सृष्टीची ओळख जगाला , ज्या अभिनेत्यांमुळे होते, त्या पैकी एक महत्वाचं नाव म्हणजेच…आपल्या सर्वांचे लाडके माननीय ‘नाना पाटेकर’ सर…आपल्या अनेकांच्या जन्माच्या अनेक वर्षे आधीपासून कार्यरत असलेले नाना सर…अनेक गाजलेली नाटकं, अनेक उत्कृष्ट चित्रपट, सामाजिक कार्यकर्ते, आणि त्याही पलीकडे एक उत्तम सरळ साधा रांगडा माणूस म्हणून जगाला आपली ओळख आहे. अनेक पिढ्यांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ‘अंकुश’ आपण आजवर ठेवलात आणि पुढेही ठेवाल…! एखादा अभिनेता किती लोकप्रिय असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पिढीचं कुठलही साधं रीलसुद्धा, नानांच्या त्या मिश्किल हसण्याशिवाय आणि ‘मजनू मजनू’ या ट्यून शिवाय पूर्ण होऊ शकत नाही…! म्हणूनच म्हणतो, “असा नट होणे नाही”. सर आपण फक्त अभिनय क्षेत्राला नाही तर महाराष्ट्रालाही खूप काही दिलंत…त्याची आठवण आम्हा प्रेक्षकांना कायम राहील…!’
View this post on Instagram
सलील कुलकर्णी यांनी नाना पाटेकर यांचा फोटो शेअर करत लिहिलं की, ‘या बातमीवर विश्वास नाहीच ठेवावासा वाटत..अगदी मागच्या महिन्यात निवांत गप्पा झाल्या….किती FIT माणूस…सगळ्यांना फिटनेस चा मंत्र देणारी व्यक्ती सामाजिक भान… संवेदनशील….साहित्य .. संगीत….नाटक…सगळ्यावर जीव….असे कसे अचानक जाऊ शकतात हे ?नाना… सर…. अहो….’
